राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानसभेत काळे फलक दाखवल्याच्या प्रकरणी सभापतींची विरोधी सदस्यांना चेतावणी
लोकशाहीच्या नावाखाली विरोधक आदरसन्मानही विसरतात का ? राज्यपाल या पदाचा तरी आदर राखूया, असे भान विरोध करतांना का रहात नाही ?
लोकशाहीच्या नावाखाली विरोधक आदरसन्मानही विसरतात का ? राज्यपाल या पदाचा तरी आदर राखूया, असे भान विरोध करतांना का रहात नाही ?
राज्यात मागील २ वर्षांत २३ मराठी प्राथमिक शाळा बंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत शिक्षणमंत्री या नात्याने बोलतांना दिली. विधानसभेत उपस्थित प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.
अत्यंत खराब स्थितीत असलेला सांताक्रूझ ते ताळगाव रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी २६ जानेवारीला सांताक्रूझ आणि ताळगाव येथील ग्रामस्थांनी आल्तिनो, पणजी येथे निदर्शने केली.
मेळावली, सत्तरीनंतर आता सांगे येथे आयआयटी प्रकल्पास विरोध होत आहे. सांगे येथे आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अशासकीय संस्था आणि कार्यकर्ते यांची नुकतीच एक बैठक झाली.
राष्ट्रीय मानचिन्हांवर आक्रमणे करणार्यांची गय न करता, या हिंसाचारास उत्तरदायी असणार्यांवर केंद्र सरकारने कडक कारवाई करावी.
देऊळवाडा, पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानच्या कालोत्सवाला २६ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला. २७ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजता च्यारी बंधू दऊळवाडा यांच्या वतीने गवळण काला होणार आहे.
विकास आणि जागतिकीकरण यांच्या दृष्टीने गोवा संपूर्ण देशासमवेत हातात हात घालून पुढे जात आहे आणि तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले.
गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक आणि साहित्यिक श्री. विनायक विष्णु खेडेकर यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने गोवा विधानसभेच्या ४ दिवसीय हिवाळी अधिवेशनाला २५ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला.
मंत्री मायकल लोबो म्हणाले, गोवा माईल्स सेवेला दाबोळी विमानतळावर काऊंटर का देण्यात आला आहे ? ही सेवा अॅपवर आधारित असल्याने प्रवासी अॅपच्या माध्यमातून या सेवेचा काऊंटरशिवाय सहजतेने लाभ घेऊ शकतात. या सेवेमुळे पारंपरिक टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे…