अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून एका वैमानिकाचा मृत्यू !

तवांग येथे भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’ कोसळल्याने झालेल्या अपघातात लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव या वैमानिकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक वैमानिक घायाळ झाला.

अरुणाचल प्रदेशामधून बेपत्ता झालेला मुलगा अंततः सापडला !

चिनी सैन्याने भारतीय सैन्याला दिली मुलाची माहिती !

चिनी सैन्याकडून अरुणाचल प्रदेशमध्ये घुसून १७ वर्षीय मुलाचे अपहरण !

‘चीन सीमेवर भारताचे राज्य आहे कि चीनचे ? येथे भारतीय सैन्य काय करत होते ?’ असे प्रश्‍न उपस्थित होतात. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा करत असतांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा सैन्याला लज्जास्पद !

अरुणाचल प्रदेश येथे वायूदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

अरुणाचल प्रदेश येते भारतीय वायूदलाचे ‘एम्आय-१७’ हे हेलिकॉप्टर कोसळले. यातील २ वैमानिक आणि ३ कर्मचारी बचावले. या हेलिकॉप्टरने प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.

चीनला पुढील दलाई लामा निवडण्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – तवांग मठाचे प्रमुख ग्यांगबुंग रिनपोचे

पुढील दलाई लामा निवडण्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा चीनला कोणताही अधिकार नाही, असे येथील तवांग मठाचे प्रमुख ग्यांगबुंग रिनपोचे यांनी चीनला ठणकावले आहे. या रिनपोचे यांनी सांगितले की, चीन सरकार कोणत्याही धर्माला मानत नाही.

(म्हणे) ‘अरुणाचल प्रदेश भारताचे नाही !’ – चीनचे पुन्हा फुत्कार

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौर्‍याला चीनचा विरोध
अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग ! – भारताचे प्रत्युत्तर

काँग्रेसच्या काळात म्हणजे १९८० च्या दशकापासून चीनचे भारतीय भूमीवर नियंत्रण !

काँग्रेसच्या काळात झालेल्या चुका भाजपच्या राज्यात सुधारणे आवश्यक आहेत, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !