अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष : ३० सैनिक घायाळ

केंद्रशासनाकडून अद्याप दुजोरा नाही !

(प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली – अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या चीन सीमेवरील तवांग भागातील यंगस्टे येथे ९ डिसेंबरच्या रात्री भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. यात ३० सैनिक घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे.

या संघर्षात चीनचे सैनिकही घायाळ झाल्याचे वृत्त आहे; मात्र या वृत्ताला केंद्रशासनाने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.