तवांग (अरुणाचल प्रदेश) – पुढील दलाई लामा निवडण्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा चीनला कोणताही अधिकार नाही, असे येथील तवांग मठाचे प्रमुख ग्यांगबुंग रिनपोचे यांनी चीनला ठणकावले आहे. या रिनपोचे यांनी सांगितले की, चीन सरकार कोणत्याही धर्माला मानत नाही. उत्तराधिकारी नेमण्याचे सूत्र आध्यात्मिक आहे. त्यामुळे चीनला हा अधिकारच उरत नाही.
ग्यांगबुंग रिनपोचे यांनी पुढे म्हटले की, चीनच्या विस्तारवादी नीतीला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. तसेच भारत सरकारला चीनसमवेत लागणार्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे.