चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी २६ अधिकारी दोषी

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग नव्याने वाढल्याने चीनच्या १ कोटीहून अधिक लोकसंख्या असणार्‍या शीआन शहरामध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. या वाढत्या संसर्गासाठी चीनने त्याच्या २६ अधिकार्‍यांना दोषी ठरवले असून त्यांना लवकरच शिक्षा करण्यात येणार आहे.

चीनच्या प्रत्येक नागरिकावर ६ लाख ८० सहस्र ६९६ रुपये इतके कर्ज

भारताच्या शेजारी देशांच्या तुलनेत चीनवर सर्वाधिक, तर बांगलादेशवर सर्वांत अल्प कर्ज आहे. पाकिस्तान तर कर्जामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. चीनच्या प्रत्येक व्यक्तीवर ६ लाख ८० सहस्र ६९६ रुपये इतके कर्ज आहे.

(म्हणे) ‘भारतीय सैनिकांचे हात रक्ताने रंगवत आहेत !’

भारताच्या संरक्षणतज्ञाने केलेल्या दाव्यानंतर चीनला मिरच्या झोंबल्याने त्याच्याकडून थयथयाट केला जात आहे, हेच यातून स्पष्ट होते !

(म्हणे) ‘हेलिकॉप्टरच्या अपघातामागे भारतीय सैन्याचा बेशिस्तपणा उत्तरदायी !’

असे खोटे आरोप करून भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा चीनचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे !

श्रीलंका सरकारच्या विरोधात चिनी आस्थापनाकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला प्रविष्ट

चीनच्या एकूणच वस्तूंची गुणवत्ता सुमार असल्याचा अनुभव जगातील अनेक देशांनी आतापर्यंत घेतला आहे. चीनला श्रीलंकेने अशा प्रकारे माल परत पाठवून दिलेले उत्तर अन्य देशांना शिकण्यासारखे आहे !

चीनची लडाख सीमेवर महामार्ग बांधणी चालू !

भारताने सीमेजवळ बांधकाम केल्यास चीन भारतामुळे सीमेवर तणाव निर्माण होत असल्याचा कांगावा करतो, मग चीन असे बांधकाम करत असतांना भारत गप्प का बसतो ?

(म्हणे) ‘भारतीय अधिकार्‍यांच्या विधानांमुळे सीमेवर तणाव वाढू शकतो !’ – चीनचा थयथयाट

सीडीएस् जनरल बिपिन रावत यांनी काही चुकीचे सांगितलेले नाही; मात्र चीनला मिरच्या झोंबल्यामुळे तो थयथयाट करत आहे. यापेक्षा चीनने सीमेवरील कुरापती बंद कराव्यात आणि अक्साई चीन भारताला परत द्यावा !

सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या चीनचा जन्मदर घसरला

‘एक मूल धोरण’ शिथिल केल्यानंतरही चिनी जनता मूल जन्माला घालण्यास सिद्ध नाहीत !

(म्हणे) ‘चीनला दक्षिणपूर्व आशियावर वर्चस्व नको ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

चीनच्या राष्ट्रपतींच्या या बोलण्यावर लहान मुल तरी विश्‍वास ठेवील का ?

तैवानप्रश्‍नी अमेरिकेने हस्तक्षेप करणे, हे आगीशी खेळण्यासारखे !  

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना थेट धमकी  
काश्मीरविषयी भारत कधी अशी स्पष्ट भूमिका घेतो का ?