तैवानप्रश्‍नी अमेरिकेने हस्तक्षेप करणे, हे आगीशी खेळण्यासारखे !  

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना थेट धमकी

काश्मीरविषयी भारत कधी अशी स्पष्ट भूमिका घेतो का ? – संपादक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (डावीकडे) चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (ऑनलाईन) बैठकीत

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील काही लोक चीनवर वचक निर्माण करण्यासाठी तैवानच्या सूत्राचा वापर करू पहात आहेत; मात्र हे फारच धोकादायक आणि आगीशी खेळण्यासारखे आहे, अशा शब्दांत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना धमकी दिली. तैवानच्या सूत्रावर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिनपिंग यांनी ही धमकी दिली.

वास्तविक या बैठकीचा मुख्य उद्देश ‘अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला संघर्ष समाप्त करणे’, हा होता; मात्र अमेरिका सातत्याने तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन करत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिनपिंग यांनी ही आक्रमक भूमिका घेत  याविषयी चीनचे धोरण स्पष्ट केले. या वेळी जो बायडेन यांनी चीनमधील शिनजियांग प्रांत, तिबेट आणि हाँगकाँग येथील चीनच्या कृतींविषयी चिंता व्यक्त केली.