चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी २६ अधिकारी दोषी

पाकमधून आलेल्या लोकांची योग्य तपासणी न केल्याचा ठपका

बीजिंग (चीन) – चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग नव्याने वाढल्याने चीनच्या १ कोटीहून अधिक लोकसंख्या असणार्‍या शीआन शहरामध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. या वाढत्या संसर्गासाठी चीनने त्याच्या २६ अधिकार्‍यांना दोषी ठरवले असून त्यांना लवकरच शिक्षा करण्यात येणार आहे. चीनमधील कोरोनाच्या संसर्गामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकमधून आलेल्या लोकांची योग्य तपासणी न केल्याने त्यांच्या माध्यमांतून संसर्ग वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनने दिलेल्या माहितीनुसार सरकारी अधिकार्‍यांनी त्यांचे दायित्व योग्य पद्धतीने पार पाडणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी तसे केले नाही. आता अशाच काही अधिकार्‍यांमुळे शीआन शहरामध्ये दळणवळण बंदी लागू करावी लागली. शीआनमधून बाहेर जाणारी आणि येणारी विमान सेवा अन् रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.