‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी सामूहिक नामजप करतांना साधकाला दिसलेले सूक्ष्मातील दृश्य

श्री. नंदकिशोर नारकर

‘२५.२.२०२५ या दिवशी ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. मी नामजप करत असतांना मला ‘प्रभु श्रीराम रामेश्वरम् येथील शिवपिंडीवर बिल्वपत्र वहात आहे आणि भगवान श्रीकृष्ण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दुग्धाभिषेक करत आहे. ती सर्व बिल्वपत्रे आणि दूध रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या कळसावर पडत आहेत’, असे दृश्य पूर्णवेळ दिसत होते.’

– श्री. नंदकिशोर दत्तात्रय नारकर (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.२.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक