गुरुकृपे आनंदाने मोक्षाची वाट चालत रहावे । 

पू. शिवाजी वटकर

या बेईमान जगती इमान का विकावे ?
स्वत्वास देवूनिया बेईमान का व्हावे ?
साधकाने पदोपदी सत्याची कास धरूनी,
भगवंताच्या चरणी एकनिष्ठ रहावे ।। १ ।।

स्वार्थांध भोवताली दिसती मजसी,
त्यांच्यासवे मिळूनी तैसेच का व्हावे ?
सत्कार्यासाठी तन, मन, धन यांचा त्याग करूनी,
भगवंताचा भक्त होऊनी आनंदी व्हावे ।। २ ।।

सर्वत्र भ्रष्टाचारी दिसती समाजी,
त्यांच्यासम वागूनी भ्रष्ट का व्हावे ?
धर्मशिक्षण घेऊनी, धर्माचरण करूनी,
राष्ट्र नि धर्मासाठी जीवन वाहून घ्यावे ।। ३ ।।

मी या जगात राहूनी, सारी दुष्कृत्ये जरी पाही,
नकळे मजशी काही, कैसे आता करावे ?
गुरुचरणी शरण जाऊनी साधनेचे प्रयत्न करावे,
गुरुकृपे आनंदाने मोक्षाची वाट चालत रहावे ।। ४ ।।

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक