काळानुसार भारतात देश-काळ यांच्या परिस्थितीनुसार अनुकूल काही संप्रदाय सिद्ध होणे, हे साहजिक होते. काळाच्या प्रवाहात त्यांच्या बर्याचशा गोष्टी सनातन धर्म ग्रंथाच्या प्रकाशात कालबाह्य झाल्या. वेद, उपनिषद इत्यादी ग्रंथांचे सार्वजनिक पठण भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा चालू झाले नाही; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या नावावर त्याची पुष्कळ मोठी अपकीर्ती केली गेली. त्यामुळे भारताचा सनातन धर्माभिमानी समाजाच्या अनेक कालबाह्य; परंतु समाजाच्या प्रगतीत अडचणी आणणार्या तर्कविरहीत कर्मकांडाच्या भाराखाली दबून गेला. सामान्य भारतीय अज्ञानामुळे धर्मनिरपेक्षतेच्या खोट्या भ्रमात फसला गेला. स्वार्थी राजकारण्यांनी राज्यघटना निर्मात्यांच्या भावनांचा अपमान करत पंथीय, पांथिक समूहांची वाहवाही करायला चालू करून अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक यांच्या रूपात भारतीय समाजाचे विभाजन करून त्यांना संघर्षाच्या स्थितीत समोरासमोर आणून उभे केले.
जगात परिवर्तनाची लाट
आज जगात मोठ्या संख्येने बुद्धीजीवी, विद्वान आणि वैज्ञानिक भारतीय सनातन धर्माकडे आकर्षित होत आहेत. हिंदु धर्माचा स्वीकार करत आहेत; परंतु भौतिकवादामुळे उत्पन्न झालेली अशांती आणि जिहादी आतंकवाद यांच्या त्रासापासून मुक्त होण्याचा मार्ग ते भारतीय धर्मात पहात आहेत. ‘भारतात वेद हे धर्माचे मूळ आधार आहेत’, असे मानले जाते. ‘वेदोऽखिलो धर्ममूलम् ।’ (मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ६), म्हणजे ‘वेद हे धर्माचे मूळ आहे.’
वेदातील विश्व धर्म
‘अथर्ववेदात जगाची भौगोलिक भाषा आणि वैचारिक विविधता’, यांविषयी सांगणारा एक यथार्थ मंत्र आहे –
जनं बिभ्रती बहुधा विवाचसं नानाधर्माणं पृथिवी यथौकसम् ।
सहस्रं धारा द्रविणस्य मे दुहां ध्रुवेव धेनुरनपस्फुरन्ती ।।
– अथर्ववेद, काण्ड १२, सूक्त १, खण्ड ४५
अर्थ : जसे एका घरात रहाणार्या लोकांचे समान प्रकारे भरणपोषण होते, तसे पृथ्वीवर पुष्कळ प्रकारच्या, विभिन्न भाषा बोलणार्या, भिन्न भिन्न मतांच्या जनसमुदायाचे सहस्रो प्रकारच्या धनधान्याने भरणपोषण होते; ज्या प्रकारे स्थिर उभी असणारी गाय कोणताही भेदभाव न करता सर्वांना सहस्रो धारांनी दूध देते.
आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे जग एक गाव बनले आहे. आपण सर्व निरनिराळ्या भाषा बोलणारे, विचार आणि दृष्टी यांमुळे निरनिराळे असलो, तरी या पृथ्वीला एक परिवार बनवण्याची प्रतिज्ञा करूया. वैचारिक भिन्नता असली, तरी परस्परांविषयी आत्मीयतेचा विचार करून चुकीच्या गोष्टी दूर करून एक कल्याणकारी राजमार्ग शोधूया.
– डॉ. श्रीलाल, संपादक (साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’)