Bangladesh Air Force Base Attacked : बांगलादेशाच्या वायूदलाच्या तळावरील आक्रमणात एकाचा मृत्यू

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील कॉक्स बाजार शहरातील वायूदलाच्या तळावर दुपारी १२ च्या सुमारास काही आक्रमणकर्त्यांनी आक्रमण केले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. दोन पक्षांमधील हाणामारीमुळे ही घटना घडल्याचेही समोर येत आहे. यात स्थानिक व्यापारी शिहाब कबीर यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पोलीस आक्रमणकर्त्यांची ओळख पटवून त्यांचा हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

बांगलादेशी सैन्याची जनसंपर्क शाखा ‘इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ने सांगितले की, हे आक्रमण तळाच्या जवळच्या समिती पारा भागातील काही गुंडांनी केले. यानंतर सैन्याने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि घायाळांना रुग्णालयात भरती केले. परिस्थिती हाताळण्यासाठी वायूदल आवश्यक पावले उचलत आहे.