साधिकेच्‍या मुलाला स्‍वप्‍नात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे दर्शन झाल्‍यावर त्‍याचे रामलल्लाचे चित्र काढून पूर्ण होणे

श्री. अथर्व धूपकर यांनी काढलेले रामलल्लाचे चित्र

. अथर्वने विविध देवता आणि रामलल्ला यांची चित्रे काढणे

‘माझा मुलगा श्री. अथर्व (वय १९ वर्षे) याची साधना चांगली होण्‍याच्‍या दृष्‍टीने मी त्‍याला नेहमी काही ना काही सुचवत असते. तो चित्रे चांगली काढतो. त्‍यामुळे ‘तू क्रांतीकारकांची किंवा देवतांची सात्त्विक चित्रे काढू शकतोस’, असे मी त्‍याला सुचवले. त्‍याप्रमाणे त्‍याने देवतांची काही चित्रे काढली आहेत. तो काही दिवसांपासून रामलल्लाचे चित्र काढण्‍याचा प्रयत्न करत होता. त्‍याचे ते चित्र २९.५.२०२४ या दिवशी काढून पूर्ण झाले.

श्री. अथर्व धूपकर

. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने अथर्वला रामलल्लाचे चित्र काढून पूर्ण करता येणे

२ अ. अथर्वने ऑनलाईन सत्‍संग ऐकणे : त्‍याच्‍या आदल्‍या दिवशी, म्‍हणजे २८.५.२०२४ या दिवशी सायंकाळी ७ वाजता सनातनच्‍या ‘ऑनलाईन’ सत्संग मालिकेतील सत्संग त्याने ऐकावा; म्हणून मी तो भ्रमणभाषवर मोठ्या आवाजात लावला होता. त्याने तो सत्संग पूर्ण ऐकला. रात्री तो नेहमीप्रमाणे श्रीकृष्णाची धून (संगीताच्या तालावरील लयबद्ध नामजप) ऐकत झोपला.

२ आ. रात्री स्‍वप्‍नात अथर्वने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांवर डोके ठेवणे : दुसर्‍या दिवशी (२९.५.२०२४) त्‍याने मला रात्री त्‍याला एक स्‍वप्‍न पडल्‍याचे सांगितले. त्‍या स्‍वप्‍नामध्‍ये ‘तो जिना उतरून खाली येत असतांना त्‍याला समोर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले उभे असलेले दिसले. तो त्‍यांच्‍याकडे न जाता डावीकडे वळून धावायला लागला. धावतांना तो पाठीमागे वळून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे पहात होता. नंतर तो उजवीकडे वळून एका दरातून आत गेला आणि त्याने दार बंद केले. थोड्याच वेळात पाठीमागचे दार उघडले आणि दारात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले उभे असल्याचे त्याला द़िसले. तिथेच त्याने त्यांच्‍या चरणांवर डोके ठेवले आणि तो रडू लागला.’

सौ. रश्‍मी संजय धूपकर

२ इ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या दर्शनानंतर रामलल्लाचे चित्र काढून पूर्ण होणे : हे ऐकल्‍यावर मला आठवले, ‘अथर्व लहान असतांना एकदा त्याची आणि प.पू. डॉ. आठवले यांची भेट झाली होती. तेव्हा ते त्याला म्हणाले होते, ‘तुला इकडेच यायचे आहे.’ आता हे स्वप्न पडल्‍याचे ऐकल्यावर मला त्या घटनेचे स्मरण झाले आणि  २९.५.२०२४ या दिवशी त्याला रामलल्लाचे चित्र काढून पूर्ण करता आले. ‘हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच घडले’, असे मला वाटते. त्याबद्दल त्‍यांच्या चरणी शरणागत भावाने कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. रश्‍मी संजय धूपकर (कु. अथर्वची आई), रत्नागिरी (२९.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक