‘त्रास शरिरात नेमकेपणाने शोधून त्‍यावर उपाय शोधले, तर परिणाम अधिक प्रमाणात होतो’, असे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगणे

पू. अशोक पात्रीकर

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्‍यासाठी प्राणशक्‍तीवहन संस्‍थेतील अडथळे दूर करण्‍याचे उपाय केले. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. आजींच्‍या पायापासून १ -२ सेंटीमीटर अंतरावर हात पकडून उपायांना आरंभ केला. तेव्‍हा मला असे वाटत होते, ‘प्राणशक्‍तीवहन संस्‍थेतील अडथळे दूर करण्‍यासाठी देहातील ६ चक्रे आणि सहस्रार यांवर न्यास करून उपाय करायचे असतात.’ ही शंका विचारल्यावर परम पूज्य डॉक्टर मला म्हणाले, ‘‘दिवसेंदिवस साधक आणि संत यांचे त्रास वाढत आहेत. त्या त्रासाचे स्थान शरिरात नेमकेपणाने शोधून त्यावर नामजपादी उपाय शोधले, तर परिणाम अधिक प्रमाणात होतो.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘आम्ही प्रसारात साधकांना सांगतो, ‘आपल्यासारख्या सामान्य साधकांना परम पूज्यांनी प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळे शोधून त्यावर नामजप शोधायला शिकवले, म्हणजेच आमची पात्रता नसतांना परम पूज्यांनी आम्हाला स्वतःपुरते ‘डॉक्टर’ बनवले. आपत्काळात हेच आवश्यक असणार. त्यासाठी कृतज्ञ राहूया.’’

– (पू.) अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७४ वर्षे) (१.७.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक