Ranveer Allahabadia Absconding : यू ट्यूबर रणवीर अलाहबादिया पसार !

  • अनेक राज्यांत गुन्हे नोंद

  • सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

मुंबई – समय रैना याच्या ‘शो इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये पालकांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणारा युट्यूबर रणवीर अलाहबादिया सध्या पसार आहे. त्याचा भ्रमणभाष बंद आहे आणि घरालाही कुलूप आहे. त्याने या प्रकरणी क्षमाही मागितली होती. त्याच्यावर देशातील विविध राज्यांत गुन्हे नोंद झाले आहेत. त्याच्या विरोधात संसदेतही आवाज उठवण्यात आला. सर्वोच्च न्यायालयातही त्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

खार पोलीस ठाण्यात त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते; पण त्याने पोलिसांना घरी येऊन जबाब घेण्याची विनंती केली; मात्र पोलिसांनी ती फेटाळली.