Places of Worship Act-1991 : सर्वोच्च न्यायालय ‘प्रार्थनास्थळ कायदा, १९९१’वर उद्या करणार सुनावणी !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालय उद्या, १७ फेब्रुवारीला प्रार्थनास्थळ कायदा १९९१ (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१) वरील याचिकांवर एकत्रित सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधिशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करतील.


१. वर्ष १९९१ चा हा कायदा १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी असलेल्या प्रार्थनास्थळांच्या धार्मिक स्वरूपामध्ये पालट करण्यास मनाई करतो.

२. अनेक याचिकांद्वारे या कायद्याच्या वैधतेला आव्हान देण्यात आले आहे.

३. काही समाजकंटक कथित धार्मिक सलोखा राखण्यासाठी या कायद्याच्या कठोर कार्यवाहीची मागणी करत आले आहेत.

४. १२ डिसेंबर २०२४ या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरा येथील शाही ईदगाहसह मशिदींचे सर्वेक्षण करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ गटांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या अनुमाने १८ खटल्यांवरील कार्यवाही थांबवली होती.

५. दुसरीकडे एम्.आय.एम्.चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी २ जानेवारीला केलेल्या याचिकेत प्रार्थनास्थळ कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची मागणी केली.

संपादकीय भूमिका

संसदेने कायदा केल्याने त्यामध्ये पालट करण्याचा अथवा तो रहित करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यामुळे कायद्याच्या घटनात्मकतेवर निर्णय घेण्यात न्यायालयाचा वेळ घेण्यापेक्षा खरेतर संसदेनेच तो एकमताने रहित केला पाहिजे, हीच हिंदु समाजाची भावना आहे !