
मुंबई : महाराष्ट्रातील लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रखर हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विशेष धर्मांतरविरोधी कायद्याच्या संदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. या निर्णयामुळे असंख्य हिंदु माता आणि भगिनी यांना फार मोठे सुरक्षा कवच महाराष्ट्र सरकार देणार आहे.
महाराष्ट्रातील लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आमचे प्रखर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार! pic.twitter.com/fH6zElsgm7
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 15, 2025
राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु समाज काही वर्षांपासून सक्षम अशा धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करत होते. त्या अनुषंगाने समिती स्थापन झाल्याने देशातील सर्वांत कठोर धर्मांतरविरोधी कायदा लवकरच राज्यात येईल, असा विश्वास मी हिंदु समाजाला देतो, असे राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे.