Foreign Delegation At Prayagraj : महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी ७७ देशांचे ११८ राजदूत प्रयागराज येथे उपस्थित !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज – महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी १ फेब्रुवारी या दिवशी ७७ देशांचे ११८ ‘हेड्स ऑफ मिशन’ राजदूत प्रयागराज येथे आले आहेत. उत्तरप्रदेश प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दक्षिण आफ्रिका, अर्जेन्टिना, जपान, मेक्सिको, नेपाळ, स्लोवाकिया, एस्टोनिया अशा ७७ देशांतून आलेले राजदूत महाकुंभमेळ्यात त्यांच्या कुटुंबियांसह सहभागी होतील.

‘हेड्स ऑफ मिशन’ राजदूत प्रयागराज

नेपाळचे राजदूत शंकर शर्मा यांनी १ फेब्रुवारीला गंगा नदीत स्नान केले. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘महाकुंभाला येण्याची पुष्कळ उत्सुकता माझ्या मनात होती. आता गंगा नदीत स्नान केल्यानंतरही मला पुष्कळ आनंद होत आहे.

‘हेड्स ऑफ मिशन’ राजदूत प्रयागराज

राज्य परराष्ट्र व्यवहार मंत्री पबित्र मार्घेरिटा म्हणाले की, महाकुंभ हा आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आहे. ७० हून अधिक राष्ट्रांचे भक्कम शिष्टमंडळ आज महाकुंभात सहभागी झाले, त्यांनी पवित्र स्नान केले आणि त्यांपैकी अनेकांनी पूजाही केली. हीच आपल्या भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि धर्म यांची शक्ती आहे. राजदुतांच्या चेहर्‍यावरील समाधानाचे भाव पाहून मला अत्यंत आनंद झाला.’’