Rajasthan Police Arrested Bangladeshi Infiltrators : अजमेर (राजस्थान) येथे २ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

अटक करण्यात आलेले बांगलादेशी घुसखोर पोलिसांसमवेत

अजमेर (राजस्थान) – राजस्थानातील अजमेरमध्ये ‘स्पेशल टास्क फोर्स’च्या (एस्.टी.एफ्.च्या) पोलिसांनी २ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. ते दोघेही घुसखोर अजमेरच्या दर्गा परिसरात रहात होते. अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आलमगीर आणि शाहीन अशी आहेत. घुसखोरांना पकडण्यासाठी चालवलेल्या मोहिमेच्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस चौकशीत आढळून आले की, वर्ष २०१२ मध्येही आलमगीर आणि शाहीन यांना पकडण्यात आले होते. नंतर त्यांना देशाबाहेर हाकलून लावण्यात आले होते; पण ते पुन्हा बांगलादेशाची सीमा ओलांडून भारतात आले आणि अजमेरमध्ये राहू लागले. याआधी पोलिसांनी जयपूरमध्येही शेकडो घुसखोरांना पकडले होते. (यावरून घुसखोरांसाठी भारत ही एक धर्मशाळा ठरली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ही स्थिती पालटण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हवे ! – संपादक)