आचार्य बालकृष्ण, अध्यक्ष, पतंजलि योगपीठ

प्रयागराज, २९ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी ‘पतंजलि योगपिठा’चे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांची भेट घेतली. या वेळी श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी आचार्य बालकृष्ण यांना समितीच्या कार्याशी अवगत केले. समितीचे कार्य जाणून घेतल्यावर आचार्य बालकृष्ण यांनी ‘समितीच्या कार्यासाठी पुष्कळ शुभेच्छा !’, असे उद्गार काढले. कुंभनगरीतील हिंदु जनजागृती समितीच्या सेक्टर क्रमांक ६ येथील प्रदर्शनकक्षाला भेट देण्याचे निमंत्रण या वेळी त्यांना देण्यात आले.