पुणे येथे एका महिलेवर धर्मांतरासाठी दबाव टाकत शारीरिक अत्याचार

  • अत्याचाराची चित्रफित सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी

  • २ पुरुषांसह १ महिलेला अटक

पुणे – ३२ वर्षीय महिलेला धर्मांतरासाठी धमकावले. तिला एका घरात डांबून ठेवून तिच्यावर सामूहिक शारीरिक अत्याचार केला. या प्रकरणी संतोष गायकवाड, सागर लांडगे यांच्यासह एका महिलेला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. धर्मांतर करण्यास दबाव टाकत अत्याचार केल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात पीडितेने प्रविष्ट केली आहे.

आरोपी आणि पीडित महिला ओळखीचे आहेत. आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करत तिला धानोरी भागत बोलावले. त्यानंतर आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देत आळीपाळीने बलात्कार केला. याचे चित्रीकरण भ्रमणभाषवर करून ते सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेला लोहगाव परिसरात नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले, असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

आरोपींविरोधात बलात्कार, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. महिलेसह ३ जणांना अटक करण्यात आली असून साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन धामणे अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • धर्मांतरासाठी महिलांवर अत्याचार होणे संतापजनक आहे. यातून अन्य धर्मियांची मानसिकता लक्षात येते !
  • धर्मांतरबंदी कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !