आदिल अलगर, महंमद अली मुल्ला, शाहजाद शेख, वीरेश आग्वांदा आणि महंमद शेख पोलिसांच्या कह्यात

पणजी, २४ जानेवारी (वार्ता.) – फातोर्डा येथून एका मनोरुग्ण युवतीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आदिल अलगर (वय १८ वर्षे), महंमद अली मुल्ला (वय २२ वर्षे), शाहजाद शेख (वय १८ वर्षे), वीरेश आग्वांदा (वय १८ वर्षे) आणि महंमद शेख (वय १८ वर्षे) यांना कह्यात घेतले आहे. सर्व संशयित वास्को येथील रहिवासी आहेत. प्राथमिक माहितीनुसार पीडित युवतीचे फातोर्डा येथून अपहरण करून तिला कासावली येथील एका सदनिकेत आणण्यात आले. या सदनिकेत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी २३ जानेवारीच्या रात्री ४ संशयितांना आणि त्यानंतर काही कालावधीने पाचव्या
संशयिताला कह्यात घेतले. चौकशीअंती पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ते अधिक अन्वेषण करत आहेत.