इस्लामी कट्टरतावादी महंमद हिजाब या ‘यू ट्यूबर’ने इस्लामची संकल्पना स्पष्ट करतांना केले अश्लाघ्य वक्तव्य
लंडन (इंग्लंड) – एकीकडे इंग्लंडमध्ये पाकिस्तानी लव्ह जिहाद्यांच्या टोळीला बळी ठरलेल्या १ सहस्र ४०० हून अधिक मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम चालू आहे, तर दुसरीकडे इस्लामी अभ्यासकांचे काही भयावह व्हिडिओही समोर आले आहेत. यांमध्ये अल्पवयीन मुलींसमवेत लैंगिक संबंध ठेवणे, हे कसे न्याय्य आहे हे सांगितले गेले आहे. महंमद हिजाब नावाचा १३ लाख अनुयायी असलेला एक यू ट्यूबर एका व्हिडिओत इस्लामची संकल्पना स्पष्ट करतांना म्हणतो की, जर त्याने १०० वर्षांच्या महिलेसमवेत लैंगिक संबंध ठेवले, तर तिला काही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते; पण जर त्याने मोठ्या नितंब आणि मोठे स्तन असलेल्या १३ वर्षांच्या मुलीसमवेत संबंध प्रस्थापित केले, तर तिला अशा कोणत्याच समस्या उद्भवणार नाहीत.
🚨Shocking Statement
I$lam|c extremist and YouTuber Mohammad Hijab has made a disturbing comment, suggesting that sexual relations with a 13-year-old girl are acceptable if she has physically developed features. 🙅♀️
Key Points:
🔹 Mohammad Hijab’s statement condones sexual… pic.twitter.com/Kt9ux7GYqA— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2025
१. विशेष म्हणजे महंमद हिजाबसारखा एकटाच यू ट्यूबर अशा प्रकारे भयावह विधाने करत नसून अनेक इस्लामी कट्टरतावादी लोक लहान मुलींशी लैंगिक संबंध ठेवणे, कसे न्याय्य आहे, याविषयी घृणास्पद मानसिकतेतून प्रचार करत आहेत.
२. या विधानांमुळे ब्रिटनमध्ये फोफावणार्या लव्ह जिहाद्यांची टोळी करत असलेल्या कुकृत्यांमागील कट्टरतावाद्यांचा पाशवी विचार समजून घेण्याचा उत्तम मार्ग आहे, असे बोलले जात आहे.
३. पाकिस्तानातील काही इस्लामी कट्टरतावाद्यांनी ब्रिटनमध्ये स्वतःची टोळी बनवून आणि निवडकपणे केवळ मुसलमानेतर मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये त्या मुलींचे वय केवळ ५, ७ अथवा १० वर्षे होते. ‘ही टोळी या ‘काफिर’ (इस्लाम न मानणार्या) मुलींना ‘कचराकुंडी’ आणि ‘वेश्या’ समजते. त्यामुळे ते आमच्यासमवेत काहीही करू शकतात, असे त्यांना वाटते’, असे पीडितांनी सांगितले.
४. महिला इस्लामी विद्वानही उघडपणे म्हणतात की, मुसलमान पुरुष काफिर महिलांवर बलात्कार करू शकतात. इस्लामी कायद्यात असेही म्हटले आहे की, जर एखाद्या मुलीने तारुण्यात पदार्पण केले असेल, तर ती विवाहसुद्धा करू शकते, मग ती १२-१३ वर्षांची असो वा १४-१५ वर्षांची !
५. लैंगिक संबंधांच्या संदर्भात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी मत व्यक्त करतांना म्हटले होते की, मुलीने ९ वर्षांची होण्यापूर्वी लैंगिक संबंध ठेवू नये. याखेरीज इतर अनेक क्रिया करता येतात, ज्यात कामुक स्पर्श आदी समाविष्ट आहेत.
संपादकीय भूमिकाअशी पैशाचिक मानसिकता जोपासणार्यांच्या विरुद्ध जागतिक स्तरावर ठोस कारवाई झाली पाहिजे. अन्यथा पुढे सर्वत्र हाहा:कार माजेल, हे निश्चित ! |