S Jaishankar On Uri N Balakot Attacks : आम्ही उरी आणि बालाकोट येथील आक्रमणांनंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – भारत आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. मुंबईत झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ च्या आतंकवादी आक्रमणानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. उरी आणि बालाकोट येथे आक्रमणे झाल्यानंतर मात्र आम्ही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना केले.

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, भारत आता सक्षम राष्ट्र आहे. ज्याच्या क्षमतेवर तरुणांचा विश्‍वास आहे. ही पिढी विज्ञान, पायाभूत सुविधा आणि उच्च तंत्रज्ञ आदी क्षेत्रांत भारताचा सन्मान वाढवत आहे. आता भारताचे यश केवळ उच्चभ्रू वर्ग किंवा मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाही.

संपादकीय भूमिका

भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही, हे काही प्रमाणात सत्य असले, तरी अद्याप काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट झालेला नाही आणि पाकिस्तानकडून आतंकवाद्यांना पाठवणे चालूच आहे. यांत पालट करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !