अमृतसर (पंजाब) – येथे गेल्या वर्षी बंद करण्यात आलेल्या गुरबक्षनगर येथील पोलीस चौकीच्या बाहेर बाँबस्फोट झाला. पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. या स्फोटामुळे कोणतीही हानी झालेली नाही. ‘हा स्फोट कसा झाला ?’, याची माहिती घेतली जात आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, पहाटे ३ च्या सुमारास बाँबस्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. लोकांचे म्हणणे आहे की, स्फोट इतका शक्तीशाली होता की, सर्व जण घराबाहेर पडले. एवढेच नाही, तर घरांच्या भिंतीही हादरल्या. काही दिवसांपूर्वी अजनाला पोलीस ठाण्याच्या बाहेर अत्याधुनिक स्फोटके सापडली होती.
संपादकीय भूमिकासध्या पंजाबमध्ये बाँबस्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. काश्मीरच्या पाठोपाठ पंजाबमध्येही आतंकवाद्यांच्या वाढत्या कारवाया, हे सुरक्षेसाठी धोकादायक ! |