UN On Gaza War : गाझा पट्टीत ७० टक्के महिला आणि मुले ठार झाल्याचा संयुक्त राष्ट्रांचा दावा

न्यूयॉर्क (अमेरिका) – गेल्या वर्षभरापासून इस्रायलकडून गाझा पट्टीत हमासच्या आतंकवादी तळांवर आक्रमणे केली जात आहेत. येथील जवळपास ८० टक्के इमारती विदीर्ण झाल्या आहेत. गाझातील ७० टक्के महिला आणि मुले ठार झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आली आहे. या युद्धात आतार्यंत ८ सहस्र ११९ जणांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे, तर गाझाच्या अधिकार्‍यांनी ही संख्या ४३ सहस्र असल्याचा दावा केला आहे.

३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने इस्रालयवर आक्रमण करून १ सहस्र २०० हून अधिक नागरिकांना ठार मारले, तर २५० हून अधिक लोकांचे अपहरण केले. त्यांच्या सुटकेसाठी इस्रायल सातत्याने आक्रमण करत आहे; मात्र हमासने अद्याप त्यांची सुटका केली नाही, उलट काही जणांची हत्या केली आहे.

संपादकीय भूमिका

  • गाझा पट्टीतील नागरिकांनी हमासच्या आतंकवाद्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. या नागरिकांच्या वस्त्यांमध्येच हे आतंकवादी लपले आहेत. त्यामुळे ‘इंद्राह स्वाह तक्षकाय स्वाह’ या प्रमाणाचे इस्रायल कृती करत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
  • संयुक्त राष्ट्रांना गाझा पट्टीतील लोकांचा जितका कळवळा येतोल तितका काश्मीरमधील हिंदूंचा का येत नाही ?