India Slams Pakistan At UN : पाकिस्तानात अल्पसंख्यांकांच्या १ सहस्र महिलांचे प्रतिवर्षी शोषण होते ! – पार्वथनेनी हरीश, संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी आणि राजदूत

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा उल्लेख करणार्‍या पाकला भारताने फटकारले !

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत वार्षिक बैठकीच्या वेळी महिलांच्या संदर्भातील सूत्रांवर चर्चा चालू असतांना पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा उल्लेख करून भारताविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानच्या या प्रयत्नाचा निषेध करत चोख प्रत्युत्तर दिले. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी आणि राजदूत पार्वथनेनी हरीश यांनी पाकिस्तानचे नाव न घेता म्हटले की, त्या देशाचा हा प्रयत्न निषेधार्ह आणि पूर्णपणे दुर्लक्ष करण्यासारखा आहे. आम्हाला ठाऊक आहे की, त्या देशातील अल्पसंख्यांक समाजातील महिलांची, विशेषतः हिंदु, शीख आणि ख्रिस्ती धर्मियांची स्थिती दयनीय आहे. त्या देशाच्या मानवाधिकार आयोगाच्या आकडेवारीनुसार या अल्पसंख्यांक समुदायातील सुमारे १ सहस्र महिला प्रतिवर्षी अपहरण, बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह यांच्या शिकार ठरतात.

संपादकीय भूमिका

गेंड्याच्या कातडीच्या पाकिस्तानला शब्दांचा नाही, तर शस्त्रांचाच मार समजतो आणि तोच त्याला देण्याची आवश्यकता आहे !