हिंदू आणि धार्मिक छळाविरुद्धचा आधुनिक काळातील लढा !

देहली येथील स्तंभलेखक डॉ. आनंद रंगनाथन् यांच्या ‘हिंदू इन हिंदु राष्ट्र’, या पुस्तकात आधुनिक भारतातील हिंदूंच्या दुर्दशेचे कटू विश्लेषण केले आहे. या पुस्तकामध्ये ऐतिहासिक छळाची तुलना केली असून देशातील धार्मिक गतीशीलतेविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘दुःख हा आपल्या जमातीचा ठसा आहे’, असे शेक्सपिअरच्या ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकात ‘शायलॉक’ या यहुदी सावकाराने म्हटले आहे. शायलॉक जर आता आसपास असता, तर त्याने अब्राहमिक (एकेश्वरवाद मानणारे) धर्मांनी केलेला द्वेष आणि क्रौर्य यांचे बळी म्हणून हिंदूंचाही त्यात समावेश केला असता. या पथप्रदर्शक नाटकात शेक्सपिअरने शायलॉकला सांगितलेला इतिहास आधुनिक काळाने सिद्ध केला आहे.

‘हिंदू इन हिंदु राष्ट्र’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ

१. इस्रायलवर क्रूरपणे आक्रमण करणार्‍या ‘हमास’ला पाठिंबा देणारे उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी !

डॉ. आनंद रंगनाथन्

ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘हमास’ संघटनेने गाझा पट्ट्यातील निष्पाप ज्यू रहिवाशांवर इतिहासातील आतापर्यंत नोंदवलेल्या सर्वांत क्रूर आक्रमणांपैकी एक आक्रमण केले. त्या वेळी ३०० हून अधिक लोकांचे अपहरण केले आणि त्यांना क्रूर छळाला सामोरे जावे लागले. वर्ष २०१२ मध्ये भारताला हादरवून टाकणार्‍या ‘निर्भया’ या घटनेनंतर ‘तरुण मुलींवर त्यांच्या पालकांसमोर कसा बलात्कार केला ?, त्यांची कशी अवस्था केली ?’, याचे वर्णन आरोपींच्या सहकार्‍यांनी केले, तेव्हा हमासचे आतंकवादी आनंदोत्सव साजरा करत होते. इस्रायलने (इतर कोणत्याही राष्ट्राप्रमाणे) आपल्या भावांना हमासच्या छळ करणार्‍या कारागृहामधून मुक्त करण्यासाठी प्रत्युत्तर दिले, तेव्हा उदारमतवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि छद्म-बुद्धीजीवी ‘हमास’ला उघडपणाने पाठिंबा देण्यासाठी बाहेर आले. इस्रायलच्या संरक्षणदलाला ‘आक्रमक’ म्हणून चित्रीत करण्यात आले होते, तर या वेतन घेणार्‍या विचारवंतांच्या दृष्टीत हमासच्या आतंकवाद्यांकडे ‘देवदूत’ म्हणून पाहिले जात होते. ज्यू लोकांचा इतिहास त्यांना भेडसावणार्‍या छळाच्या आणि त्यांच्या अस्तित्वासाठीच्या संघर्षाच्या कथांनी भरलेला आहे. यहुद्यांना त्यांच्यावर अत्याचार करणार्‍यांकडून ज्या क्रूरतेचा सामना करावा लागला, त्या क्रूरतेचा सामना हिंदूंच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही समुदायाला करावा लागला नाही. इस्रायलला फटकारणे आणि अरब, तसेच पॅलेस्टिनींची स्तुती करणे, हे एखाद्याच्या बौद्धिक कौशल्याचे मोजमाप बनले.

२. भारतातील ८० टक्के लोकसंख्या असलेल्या हिंदूंच्या मालमत्तांवर ‘वक्फ बोर्ड’च्या माध्यमातून आक्रमण !

भारतातील हिंदूंना आता याचाच सामना करावा लागत आहे. भारताची ८० टक्के लोकसंख्या हिंदू असली, तरी अल्पसंख्यांकांच्या हातून त्यांना अशाच प्रकारच्या यातना आणि क्रूरता यांचा सामना करावा लागत आहे. सनातन धर्माची भूमी, हिंदु धर्म यांवर आक्रमण करणारे मुसलमान भारतातील ७० टक्क्यांहून अधिक भूमीच्या मालकीचा दावा करत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांचे ‘अँटिलिया’ हे ४.६ अब्ज डॉलर्स मूल्य असलेले २७ मजली खासगी निवासस्थान वक्फच्या भूमीवर बांधण्यात आले आहे’, असा दावा एका मौलवीने केला होता. त्याविषयीचे स्पष्टीकरण देणे, हे मुकेश अंबानी यांचे काम आहे. पुढे हेच लोक राष्ट्रपती भवन आणि ७ लोककल्याण मार्ग आपले असल्याचा दावा करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. या गोष्टी विसरून जा !

डॉ. आनंद रंगनाथन् यांच्या म्हणण्यानुसार साम्यवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात काम करणारे शास्त्रज्ञ, लेखक आणि राजकीय टीकाकार हिंदू आठव्या दर्जाचे नागरिक बनले आहेत. त्यांच्याच देशात राज्याने संमत केलेल्या वर्णभेदात फसले आहेत.

३. डॉ. आनंद रंगनाथन यांचे ‘हिंदू इन हिंदु राष्ट्र’ पुस्तक म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी शक्तीशाली ठोसाच !

डॉ. रंगनाथन् दृढ निश्चयाने बोलतात आणि लिहितात. जनुकीय अभियंता आणि जैवतंत्रज्ञानतज्ञ म्हणून आपल्या व्यवसायाशी सुसंगत असलेले डॉ. रंगनाथन् यांनी देशातील हिंदूंच्या दुर्दशेमागील मूलभूत कारणे शोधून काढली आहेत अन् ‘ब्लूवन इंक’ यांनी प्रकाशित केलेल्या ‘हिंदू इन हिंदु राष्ट्र’ या त्यांच्या पुस्तकाद्वारे त्यांनी हे स्पष्ट केले आहे. १२८ पानांचे हे पुस्तक म्हणजे आनंद रंगनाथन् या अशक्त प्राध्यापकाने ज्याचा प्रतिकार प्रतिस्पर्धी करू शकणार नाहीत, असा शक्तीशाली ठोसा लगावलेला आहे.

४. भारतामध्ये हिंदूंना ‘आठव्या दर्जाचे नागरिक’ समजून अल्पसंख्यांकांना संसाधनांचा पहिला अधिकार देण्याला प्राधान्य !

लेखकाने ‘गो’ (‘जा’) या शब्दावरून स्वतःचा हेतू स्पष्ट केला आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘हे कोणत्या प्रकारचे हिंदु राष्ट्र आहे ?’ असे आपण ‘अधिनायकवादी (निरंकुश) हिंदु राष्ट्रात जगत आहोत’, असा दावा करणार्‍यांना विचारायला हवे. भारतामध्ये संसद, न्यायालये, शिक्षणव्यवस्था आणि राज्यघटना यांच्या माध्यमातून कोट्यवधी हिंदूंना केवळ दुय्यम दर्जाचे नव्हे, तर आठव्या दर्जाचे नागरिक बनवले गेले आहे. हे कोणत्या प्रकारचे हिंदु राष्ट्र आहे, जिथे दुर्गापूजा आणि गरबा उत्सव यांच्यावर दगडफेक केली जाते, जिथे तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान अल्पसंख्यांकांना संसाधनांचा पहिला अधिकार असल्याचा दावा करतात ? मी या पुस्तकाविषयी लिहित असतांना कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे लोकांच्या एका गटाने दगडफेक करून गणपतीची मूर्ती विसर्जित केल्याच्या वृत्तांचे मथळे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून दाखवले जात होते.’

५. हिंदूबहुल भारतात हिंदूंना डावलून अल्पसंख्यांकांना विशेष अधिकार !

श्री. कुमार चेल्लप्पन

‘हमास’ आणि ‘हिजबुल्ला’ या संघटनांचे आतंकवादी अन् जिहादी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मार्क्सवादी-मुल्ला-काँग्रेस आघाडीने केरळमध्ये राज्यव्यापी निषेध मोर्चे काढले. ‘जमात-ए-इस्लामी’च्या मालकीची एक दूरचित्रवाहिनी आणि वृत्तपत्र वर्ष २०१४ पासून भारतात अभिव्यक्ती अन् धार्मिक स्वातंत्र्य नसल्याचे सांगत २४ घंटे शोक व्यक्त करते. ही वाहिनी २४ घंटे भारतविरोधी बातम्या प्रसारित करते. त्यामुळे दूरचित्रवाहिनी आणि वृत्तपत्रे यांच्या मागे लपलेल्या हेतूविषयी गृह विभाग, तसेच माहिती अन् प्रसारण मंत्रालय यांच्याकडे तक्रार करण्यासाठी प्रेक्षकांना बळजोरी करावी लागते. सर्वोच्च न्यायालय उद्धटपणासाठी केंद्राला फटकारून वाहिन्यांच्या साहाय्याला येते. केवळ भारतात अल्पसंख्यांक समुदायांना मिळणारा हा विशेष अधिकार आहे. इस्लाममध्ये धर्मांतर करण्यास भाग पाडल्यासाठी हिंदूंना दोषी धरले जाऊ शकत नाही; परंतु बहुतेक सनातनींना असे करण्यापासून जे रोखते, ते म्हणजे या प्रक्रियेत होऊ शकणारी तीव्र वेदना !

६. मंदिरांच्या दानपेटीवर लक्ष ठेवून ‘देवस्वम् मंडळा’चे अध्यक्षपद मिळवण्यास धडपडणारे नास्तिक राजकीय नेते !

मला वाटते की, डॉ. रंगनाथन हे स्वतःचे म्हणणे सौम्यपणे मांडणारे आहेत. हिंदूंच्या अधोगतीची स्थिती त्यांनी ८ प्रकरणांमध्ये स्पष्ट केली आहे. काँग्रेस असो, भाजप असो किंवा तिसरी आघाडी असो, ‘हिंदु मंदिरांचे राज्य नियंत्रण’ या प्रारंभीच्या प्रकरणात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची कोणतीही उत्तरे कोणत्याही राजकीय पक्षांकडे नाहीत. जिथून मी आलो आहे, त्या केरळमध्ये विधानसभा किंवा संसदेत जागा मिळवण्यात अपयशी ठरलेले राजकारणी ते ‘देवस्वम् मंडळा’चे अध्यक्ष (त्रावणकोर, कोची आणि मलबार) या सर्वांत प्रतिष्ठित पदासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. ‘मार्क्सवादी साम्यवादी पक्ष (सीपीआय (एम्.))’, ‘भारतीय साम्यवादी पक्ष (सीपीआय)’ आणि ‘रिव्हॉल्युशनरी सोशालिस्ट पक्ष (आर्.एस्.पी.)’ या पक्षांमधील तर्कवादी अन् नास्तिक लोकही अध्यक्षपदावर बसवण्यासाठी अन् हुंडी (दानपेटी) चोरण्यासाठी आस्तिक होतात.

७. हिंदूंना भेडसावणार्‍या समस्यांविषयी कुणी प्रश्न विचारणे किंवा आवाज उठवणे म्हणजे अक्षम्य पाप !

देवाला अर्पण केलेल्या लाडूंमध्ये डुकराची चरबी मिसळण्याच्या स्वरूपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायावर प्रश्न उपस्थित करण्याचा हिंदूंना कोणताही अधिकार नाही. जर तुम्ही या कृतीवर प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस केले, तर ‘धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे’, हा दावा करून न्यायालय हिमस्खलनासारखे तुमच्यावर कोसळेल.

‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द भारतात सर्वांत त्रासदायक झाला आहे; कारण एका न्यायाधिशाने आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना तिरुपती येथील लाडूच्या प्रकरणावर गप्प रहाण्यास सांगितले होते.

हिंदूंना भेडसावणार्‍या प्रत्यक्ष परिस्थितीची पर्वा न करणार्‍यांना विचारायचे आहे, ‘‘कृष्णा, गोदावरी, कावेरी, गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा यांच्या किनार्‍यावर असलेल्या वेदपाठशाळा अन् गुरुकुले यांचे काय झाले ?’’ डॉ. आनंद रंगनाथन्, आर्. वैद्यनाथन्, राजीव मल्होत्रा, संदीप बालकृष्ण आणि अर्थातच अरुण शौरी यांनी विचारलेले प्रश्न विचारणे, हे हिंदु देशात अक्षम्य पाप ठरत आहे.

आपल्या नागरिकांना खर्‍या इतिहासापासून दूर ठेवणारा भारत हा जगातील एकमेव देश असू शकतो. (संदर्भ : The IX volume of History and Culture of Indian People edited by that wonderful historiak Prof.R.C. Mujumdar) ‘केवळ मूर्तीपूजकच अशुद्ध आहेत (सूरह ९, आयत ५) आणि काफिर तुमचे उघड शत्रू आहेत’, असे एकमेव पैगंबरांनी दिलेले निर्देश स्पष्ट करणे हा या देशातील ‘गुन्हा’ आहे. (सुराह (४ः१०१)) (संदर्भ : Quotes from The Calcutta Quran Petition authored by Sita Ram Goel)

जर हिंदूंनी डॉ. आनंद रंगनाथन् यांच्या निरीक्षणांची नोंद घेतली नाही, तर ते पप्पू, गावंढळ आणि मूर्ख ठरतील. धार्मिक वर्चस्वाच्या या युगात रंगनाथन्, वैद्यनाथन् आणि राजीव मल्होत्रा यांच्यासारखे विद्वान, म्हणजे आशेचे किरण आहेत. त्यांचे बोलणे किंवा लिखाण यांकडे लक्ष द्यायला हवे.

– श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, चेन्नई, तमिळनाडू.