नवी देहली – ‘टेलिग्राम’ या सामाजिक माध्यमावर भारतात कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २ दिवसांपूर्वीच फ्रान्समध्ये टेलिग्रामचा संस्थापक डुरोव याला अटक करण्यात आली. इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या टेलिग्राम वापरण्यावर कारवाई न केल्याने पावेल डुराव याला अटक करण्यात आली. भारतात नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उघड झाल्यामध्ये टेलिग्राम अॅपचे नाव समोर आले आहे. टेलिग्रामवर खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने टेलिग्रामची चौकशी चालू केली आहे.
जर यात तथ्य आढळले, तर भारतात टेलिग्राम अॅपवर बंदी घातली जाऊ शकते.