संपादकीय : ‘धर्मनिरपेक्ष’ नव्हे, हिंदु व्हा !

बांगलादेशातील हिंदूंची परिस्थिती दर्शविणारे छायाचित्र

बांगलादेशात आरक्षणावरून चालू करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंदुविरोधी स्वरूप देऊन तेथे हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. या आक्रमणात हिंदूंची अत्यंत क्रूर पद्धतीने हिंसा करण्यात आली. स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. लहानग्या मुलांचे गळे आवळून हत्या करण्यात आल्या. सैतानालाही लाजवेल, असा नंगानाच धर्मांध मुसलमानांनी बांगलादेशात घातला. या नरसंहाराचा निषेध करण्यासाठी भारतभर ठिकठिकाणी हिंदूंनी आंदोलने केली, तसे महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले. नाशिक येथे आंदोलनकर्त्या हिंदूंवर मुसलमानांनी आक्रमण केले. यामध्ये नेहमीप्रमाणे मुसलमानांनी पोलिसांनाही चोप दिला. येथे हिंदूंना मुसलमानांच्याही आक्रमणाचा सामना करावा लागला आणि पोलिसांचे दंडूकेही खायला लागले. प्रश्न आहे की, हिंदू आणखी कुठे कुठे पिचणार ? बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले म्हणून हिंदूंनी भारतातील मुसलमानांच्या हत्या घडवल्या नाहीत. बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतातही बांधवांच्या नरसंहाराचा साधा निषेधही हिंदूंना करता येत नसेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्याचा अर्थ तो काय ? बहुसंख्य असलेल्या समाजावर अल्पसंख्यांक आक्रमण करण्याचे धाडस करतात, यात अल्पसंख्यांकांचे शौर्य नाही, तर हिंदूंची नपुंसकता आहे. गेल्या अनेक वर्षांत हिंदूंना कायद्याने, पत्रकारितेने, समाजसुधारणेच्या नावाने, पुरोगामित्वाच्या नावाने आणि राज्यघटनेच्या आडून हिंदूंना पद्धतशीरपणे नपुंसक करण्याचे काम काँग्रेसने केले. यामुळे बहुसंख्य हिंदूंवर आक्रमण करण्याचे धारिष्ट्य मुसलमान करू शकतात. मुसलमानांच्या आक्रमणाचे हिंदूंनी वेळीच स्वसंरक्षणार्थ चोख प्रत्युत्तर दिले नाही, तर भविष्यात बंगाल, केरळ, काश्मीर आदी मुसलमानबहुल भागांमध्ये बांगलादेशाप्रमाणे स्थिती ओढवायला वेळ लागणार नाही, अशी दुःस्थिती सध्या भारतात आहे. बांगलादेश, पाकिस्तान येथे हिंदू ‘अल्पसंख्यांक’ म्हणून, तर भारतात हिंदू ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून मार खातात. त्यामुळे भविष्यातही मार खायचा असेल, तर हिंदूंनी धर्मनिरपेक्षच रहावे आणि मुसलमानांच्या आक्रमणाला स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर ‘हिंदु’ होणे, नव्हे नव्हे धर्माभिमानी हिंदु होणे, हाच हिंदूंचे अस्तित्व राखण्याचा एकमेव मार्ग आहे.

‘हिंदु स्वत: धर्मनिरपेक्ष आहेत’, म्हणून त्यांनी मुसलमानांना धर्मनिरपेक्ष समजण्याची चूक करू नये. यापूर्वी वर्ष २०१२ मध्ये म्यानमार येथे मुसलमानांवर आक्रमण झाल्याचा गवगवा करून महाराष्ट्रातील मुंबई येथे आझाद मैदानात मुसलमानांनी मोर्चा काढला आणि काही संबंध नसतांना हिंदूंवर आक्रमण केले. येथील सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलिसांवरही आक्रमण करायला हयगय केली नाही. म्यानमारमधील कथित आक्रमणावरून मुसलमानांनी महाराष्ट्रात हिंसा करावी; परंतु बांगलादेशात हिंदु बांधवांचा नरसंहार होऊनही हिंदूंनी भारतात निषेधाच्या घोषणा दिल्यावरही मुसलमानांच्या भावना दुखावल्या जात असतील, तर अशी धर्मनिरपेक्षता हिंदूंचे अस्तित्व शिल्लक ठेवणार नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष रहाणे, म्हणजे भविष्यात धर्मांधाच्या हातून मरण्यासारखे आहे, हे हिंदूंनी पक्के समजून घ्यावे.

मुसलमानधार्जिण्यांचा धर्मनिरपेक्षतेचा उपदेश !

भारत स्वतंत्र  झाल्यावर ज्या काँग्रेसने भारताची सत्ता हातात घेतली, त्यांनी खरी धर्मनिरपेक्षता पाळायला हवी होती. राज्य कारभार करतांना राजा म्हणून सर्व प्रजेला समान अधिकार, समान न्याय आणि समान वागणूक दिली असती, तर ती खरी धर्मनिरपेक्षता झाली असती; परंतु काँग्रेसने नेहमीच मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी कायदे केले आणि कायदे वाकवले. म. गांधी, नेहरू आणि काँग्रेसचे नेतृत्व करणारे गांधी घराण्याचे नेते यांनी त्यांची पूर्ण हयात मुसलमानांच्या लांगूलचालनात घालवली आणि हिंदूंना मात्र कायम धर्मनिरपेक्षतेचा डोस पाजला. धर्मनिरपेक्षता, म्हणजे अन्य धर्मियांच्या भावनांचा आदर करण्यासाठी स्वत:चा धर्म उघड न करणे आणि अन्यांच्या धर्माचा आदर करणे, अशी तथाकथित धर्मनिरपेक्षता काँग्रेस, साम्यवादी अन् त्यांना साथ देणारे पुरोगामी यांनी हिंदूंच्या इतक्या वर्षांत गळी उतरली. याचा इतका अतीसार झाला आहे की, स्वत:ला हिंदु म्हणून घेण्यासही हिंदूंना लाज वाटायला लागली आहे.

‘सार्वजनिक ठिकाणी स्वत:ची हिंदु म्हणून ओळख दाखवणे, म्हणजे मुसलमानांच्या भावना दुखावणे’ इतका हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचा अतीसार झाला आहे. हा धर्मनिरपेक्षतेचा अतीसार जर असाच चालू राहिला, तर भविष्यात हिंदूंचा विनाश अटळ आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या अतीसारावर ‘हिंदु धर्माभिमान’ हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे धर्माच्या मुळावर उठलेल्या धर्मनिरपेक्षतेलाच लाथ मारा. जगात मुसलमान, ख्रिस्ती आदी पंथ केवळ त्यांच्याच पंथाला आणि स्वत:च्याच प्रेषितांना मानतात. उलट हिंदु धर्म असा एकमेव धर्म आहे, तो प्रत्येक उपासनेचा आदर करतो. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची आवश्यकता हिंदूंना नव्हे, तर अन्य धर्मियांना आहे.

स्वधर्माचा पुरस्कार हाच मार्ग !

भारतात धर्मनिरपेक्षतेचा कडेलोट इतका झाला आहे की, बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार झाला, तरी हिंदुत्वनिष्ठ म्हणून ओळख असलेले पक्ष हिंदूंच्या बाजूने उघड भूमिका घेऊ शकत नाहीत, अशी स्थिती आली आहे. भाजप, शिवसेना किंवा अन्य हिंदुत्वनिष्ठ पक्ष यांनी यदाकदाचित हिंदूंच्या बाजूने भूमिका घेतलीच, तर तथाकथित पुरोगामी आणि काँग्रेससारखे मुसलमानधार्जिणे राजकीय पक्ष त्यांना ‘जातीयवादी’ म्हणून हिणवतात. हिंदुत्वनिष्ठ पक्षांमध्येही हिंदूंच्या बाजूने कुणी ठाम भूमिका घेतलीच, तर त्यामुळे ‘अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावल्या जातील, त्यांची मते मिळणार नाहीत’, याची धास्ती पक्षश्रेष्ठींना असते. त्यामुळे त्यांना पक्षाकडून उमेदवारी डावलली जाते. त्यातच हिंदूंच्या बाजूने ठाम भूमिका घेतल्यावर धर्मनिरपेक्ष हिंदु समाज त्यांना मतदान करीलच, याची शाश्वती नाही. इतका सारा घोळ या धर्मनिरपेक्षतेने करून ठेवला आहे. त्यामुळे ‘या तथाकथित धर्मनिरपेक्षतेला तिलांजली देऊन हिंदूंनी स्वधर्माचा पुरस्कार करणे’, हाच हिंदूंचे अस्तित्व राखण्याचा एकमेव मानतातआहे.

अल्पसंख्यांक म्हणून काँग्रेसने मुसलमानांना मोठे केले, त्यामुळे ते आता हिंदूंच्या डोक्यावर बसले आहेत. गळा चिरल्यावर हिंदूंच्या मुडद्यांनीही धर्मनिरपेक्षता जपावी, असे तत्त्वज्ञान पाजाळायलाही पुरोगामी मंडळी न्यून पडणार नाहीत; परंतु ‘भविष्यात हिंदूंना अस्तित्व राखायचे असेल, तर हिंदु धर्माभिमानी होणे’, हाच छत्रपती शिवरायांनी सांगितलेला मार्ग हिंदूंना अवलंबावा लागेल !

धर्मनिरपेक्षतेने हिंदूंना नपुंसक बनवले, तर हिंदुत्वाने छत्रपती शिवराय घडले, यातून धर्म कुठे सुरक्षित आहे ? हे हिंदूंनी ठरवावे !