सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

९.७.२०२४ या दिवशी यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

मागील भाग येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/812394.html

पू. वामन राजंदेकर

३. तिसरा दिवस (२६.६.२०२४)

सौ. मानसी राजंदेकर

अ. आज महोत्सव बघत असतांना पू. वामन म्हणाले, ‘‘या अधिवेशनाला उपस्थित सर्वांना नारायणांचे आशीर्वाद मिळत आहेत.’’

आ. पू. वामन म्हणाले, ‘‘आज महोत्सवस्थळी चैतन्य जाणवले आणि महोत्सव बघतांना माझे मन शांत होते.’’

इ. ‘प्रत्यक्ष नारायण महोत्सवस्थळी उपस्थित होते. त्यांच्या समवेत सगळ्या देवतासुद्धा आल्या होत्या. आज दिवसभर महोत्सवात सर्वत्र लाल रंग पसरलेला दिसत होता’, असे पू. वामन यांनी सांगितले.

४. चौथा दिवस (२७.६.२०२४)

अ. पू. वामन यांनी आजचा कार्यक्रम बघितला; परंतु आज दिवसभरात विशेष असे काही बोलले नाही. ते थोडे शांत होते.

आ. संध्याकाळचे सत्र संपल्यावर पू. वामन म्हणाले, ‘‘सर्वांनी नारायणांचे स्मरण करत पुढे जायला पाहिजे. ते केले नाही, तर आपण मागे मागे जात जाणार.’’

इ. ‘आज दिवसभर महोत्सवात सर्वत्र केशरी आणि पांढरा हे रंग पसरलेले दिसत आहेत’, असे पू. वामन यांनी सांगितले.’

(समाप्त)

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांची आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे), फोंडा, गोवा. (२७.६.२०२४)

पू. वामन राजंदेकर यांच्या वरील बोलण्याच्या संदर्भात सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी सांगितलेली सूत्रे

श्री. निषाद देशमुख

‘पू. वामन राजंदेकर यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या प्रत्येक दिवशी त्यांना दिसलेले जे रंग सांगितले आहेत, ते सर्व अगदी योग्य आहेत. हे सर्व रंग प्रत्येक दिवसाची महोत्सवस्थळाची स्थिती दाखवत आहेत.

१. पहिल्या दिवशी आनंद आणि भाव होता. त्यामुळे त्यांना आकाशी निळा रंग दिसत होता.

२. दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी सूक्ष्म युद्ध चालू होते. त्यामुळे त्यांना सूर्याचे तेज असलेला पिवळा आणि लाल हे रंग दिसत होते.

३. चौथ्या दिवशी संतांच्या मार्गदर्शनामुळे धर्मतेज आणि निर्गुण तत्त्व होते. त्यामुळे त्यांना पांढरा आणि केशरी हे रंग दिसत होते.’ (‘या दिवशी भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे आणि पू. डॉ. शिवनारायण सेन (उपसचिव, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल) या संतांचे मार्गदर्शन होते.’ – संकलक)

– श्री. निषाद देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.६.२०२४)

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/813327.html