‘२४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला. त्याचे थेट प्रक्षेपण बघतांना सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. ११.७.२०२४ या दिवशी यातील काही सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.
याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/813046.html
२८.६.२०२४ (पाचवा दिवस)
१. आज सकाळचे सत्र चालू झाल्यावर पू. वामन यांनी त्यांच्या खेळण्यातील प्लास्टिकचे ठोकळे जोडून मंदिर बनवले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘हे श्रीराम मंदिर आहे. आता पुढच्या काळात याचीच आवश्यकता आहे.’’
२. सभागृहात पुष्कळ प्रकाश पसरलेला आहे, तसेच तिथे पिवळा रंगही पसरलेला आहे.
२९.६.२०२४ (सहावा दिवस)
१. सकाळच्या सत्रामध्ये सभागृहात आकाशी निळा रंग पसरलेला दिसत होता.
२. ‘अधिवक्ता कृष्णमूर्ती व्यासपिठावरून बोलत असतांना नारायण (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) त्यांच्या पाठीशी उभे आहेत’, असे जाणवले.
३. संध्याकाळच्या सत्रात सभागृहात निळा रंग अधिक गडद झालेला दिसत होता.
४. संध्याकाळच्या सत्रात ‘व्यासपिठावरील वक्त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष नारायणच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच) बोलत आहेत’, असे जाणवले. तसेच ‘सभागृहात देवी-देवता आल्या आहेत आणि त्या व्यासपिठावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे जाणवले.
५. तसेच तिथे पुष्कळ जास्त प्रकाश दिसत होता.
(‘हे अगदी बरोबर आहे. आम्हाला सूक्ष्म परीक्षणातही तसेच जाणवले आहे. ‘अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्या मागे भगवान श्रीकृष्ण उभे होते’, असे दिसले.’ – श्री. निषाद देशमुख, सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ता साधक, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
३०.६.२०२४ (सातवा दिवस)
१. आज अधिवेशनात कोणतेच युद्ध नव्हते. सर्वकाही सरळ होते. सभागृहात निळा रंग पसरलेला दिसत होता.
(‘हे योग्य आहे; कारण आज समापन (अधिवेशनाचा शेवटचा दिवस) असल्याने सर्वांची भावावस्था होती. त्यामुळे निळा रंग दिसणे योग्य आहे.’ – श्री. निषाद देशमुख)
२. आज पू. वामन हे काही वेळ प्रत्यक्ष अधिवेशन स्थळी गेले होते. त्या वेळी ते सभागृहात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या बाजूला आसंदीत बसले होते. याविषयी सांगतांना पू. वामन म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष नारायणच माझ्या जवळ बसले आहेत’, असे मला जाणवले. तसेच मला भाव जाणवला.’’
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांची आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे), फोंडा, गोवा. (३०.६.२०२४)
|