- केवळ भूमीवर बसून योगाभ्यास न करता खाली काहीतरी अंथरून त्यावर बसा !
- आसने करतांना स्वच्छ, हलके, सैलसर आणि आवश्यक तेवढेच कपडे घाला !
- हात, पाय, मान, खांदे आदींच्या संदर्भात क्रिया करतांना ते अवयव, तसेच पाठीचा कणा ताठ ठेवा, तरच त्या क्रियेचा पूर्ण लाभ होईल !
- योगासने करतांना श्वास कधी घ्यायचा आणि कधी सोडायचा याचे शास्त्र नीट समजून घ्या ! श्वास घेण्याच्या-सोडण्याच्या क्रियेत चूक झाली, तर त्रास होऊ शकतो.
- पोट साफ नसतांना योगाभ्यास करू नका. पोट साफ झाल्यावरच योगाभ्यास केला, तरच त्याचा अपेक्षित लाभ होईल !
- व्यायाम प्रथमच करत असल्यास पहिल्याच दिवशी पुष्कळ व्यायाम करू नये.
- योग्याभ्यास केल्यावर अर्धा घंटा अंघोळ, न्याहारी किंवा जेवण, तसेच रसायनांशी संपर्क किंवा विषारी फवारे यांच्याशी संबंधित कामे करू नका !
- योगाभ्यास बंदिस्त खोलीत करू नका. खिडक्या उघड्या ठेवा किंवा मोकळ्या वातावरणात योगाभ्यास करा.
- पंखा लावून योगाभ्यास करू नका.
- योगाभ्यास करतांना निरर्थक विचार करू नका.
- विशिष्ट प्रकारच्या आजारात अपायकारक ठरणारी आसने करू नयेत. मासिक पाळीच्या काळात किंवा बाळंतपणात योगासने करू नयेत.
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.