ISIS Gerard Pushparaja Osman Arrested : कर्णावती येथे अटक केलेल्या ४ आतंकवाद्यांच्या साथीदाराला श्रीलंकेत अटक

कोलंबो (श्रीलंका) – गुजरातच्या कर्णावती येथून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या महंमद नुसरत, महंमद फारुख, महंमद नाफ्रान आणि महंमद रसदीन या ४ आतंकवाद्यांच्या साथीदाराला श्रीलंकेच्या पोलिसांनी त्यांच्या देशातून अटक केली आहे. जेरार्ड पुष्पराजा उस्मान असे त्याचे नाव आहे. श्रीलंका पोलिसांनी अलीकडेच त्याच्या ठावठिकाणाविषयी कोणतीही माहिती दिल्यास २० लाख रुपयांचे रोख बक्षीस घोषित केले होते. कर्णावती येथून अटक करण्यात आलेले आतंकवादी श्रीलंकेचेच नागरिक आहेत. ते भारतात घातपात करणार होते.

अटक करण्यात आलेले इस्लामिक स्टेटचे आतंकवादी

कर्णावती येथे अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांनी चौकशीत सांगितले होते की, ते पूर्वी आतंकवादी संघटना ‘नॅशनल तौहीद जमात’शी संबंधित होते. नंतर ते इस्लामिक स्टेटसाठी काम करू लागले.