Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात गेल्या ३ मासांत हिंदूंवर प्रतिदिन झाली ३ आक्रमणे !

बांगलादेशातील शेख हसीना सरकार हिंदूंवरील आक्रमण रोखण्यात अपयशी

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात या वर्षी जानेवारी मासात सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर शेख हसीना सरकार अल्पसंख्यांक हिंदूंवरील धर्मांध मुसलमानांकडून होणारी आक्रमणे थांबवण्यात अपयशी ठरले आहे.

१. या निवडणुकीत हिंदूंनी शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’ पक्षाला मतदान केले होते. निवडणुकीच्या काळातही हिंदूंवर आक्रमण झाली होती आणि शेख हसीना यांचा पक्ष सत्तेवर आल्यानंतरही ही आक्रमणे चालूच असल्याने हिंदूंमध्ये भीतीचेच वातावरण आहे.

२. हिंदूंच्या संघटनांचा दावा आहे की, निवडणुकीनंतर प्रतिदिन हिंदूंवर ३ आक्रमणे होत आहेत. बांगलादेशमधील कुश्तिया, बागेरहाट, जेनैदाह, गैबांधा, चटगाव आणि सिलहट, या ६ जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर आक्रमणे होत आहेत.

३. ‘हिंदु, बौद्ध, ख्रिश्‍चन ओइक्या परिषदे’चे सदस्य रंजन करमाकर यांनी सांगितले की, निवडणुकीनंतर अल्पसंख्यांक आणि मंदिरे यांवर होणारी आक्रमणे चिंताजनक आहेत. या प्रकरणी कारवाई होत नसल्यामुळे अनेक धर्मांध संघटनांचे धाडस वाढत आहे. भविष्यात अशी आक्रमणे रोखण्यासाठी आरोपींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे.

गेल्या ३ मासांत झालेली काही आक्रमणे

  • चटगाव येथील सीताकुंडमध्ये बारबनल मंदिराची तोडफोड
  • मौलवी बाजार येथील श्री काली मंदिरात मूर्ती फोडून दागिन्यांची चोरी
  • गोपालगंजच्या सदर उपजिल्ह्यात महिला पुजार्‍याची गळा दाबून हत्या आणि देवीच्या मंदिरातून सोन्याच्या दागिन्यांची लूट
  • एका तरुणाकडून सिराजगंजमध्ये श्री कालिमाता मंदिरावर आक्रमण करून अनेक मूर्तींची विटंबना
  • बरिसलमध्ये राधा-गोविंद सेवाश्रम मंदिरावर आक्रमण

संपादकीय भूमिका

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत; मात्र त्याचा तेथील हिंदूंना काहीच लाभ होत नसून उलट हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे, हे भारताला लज्जास्पद आहे !