‘हलाल प्रमाणपत्र’ हे केवळ मांसाहारी पदार्थांपुरते मर्यादित राहिलेले नाही. शाकाहारी खाद्यपदार्थांपासून सौंदर्यप्रसाधनापर्यंत आणि औषधांपासून पर्यटनापर्यंत सर्वांसाठी लागू झाले आहे. ‘हलाल टाऊनशिप’पासून ते अगदी ‘हलाल टुरिझम’पर्यंत ते लागू आहे. आज वाढत्या मुसलमान जनसंख्येच्या बळावर ‘कॅडबरी’पर्यंतच्या अनेक बहुराष्ट्रीय आस्थापनांना या हलाल अर्थव्यवस्थेने झुकण्यास भाग पाडले आहे. विदेशात हलाल औद्योगिक वसाहत, ‘माझमा’ मॉल अशा विविध पद्धतींनी ‘हलाल जीवनशैली’च्या माध्यमातून ‘हलाल प्रमाणित अर्थव्यवस्था’ विकसित करण्याचे कार्य वेगाने चालू आहे.
पूर्वी इस्लामनुसार ज्या गोष्टी ‘हराम’ होत्या त्या काळानुसार पैसे आणि धर्मप्रसार यांसाठी मुसलमानांनी ‘हलाल’ ठरवल्या ! जसे सौंदर्यप्रसाधने वापरणे हराम असूनही त्याला हलाल प्रमाणपत्र देण्यात आले.
१. सुप्रसिद्ध ‘हल्दीराम’चे शुद्ध शाकाहारी ‘नमकीन’सुद्धा आता हलालप्रमाणित झाले आहे. सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, मध, तुलसी अर्क यांचाही त्यात समावेश झाला.
२. यात धान्य, तेल यांपासून ते साबण, शाम्पू, टूथपेस्ट, काजळ, नेलपॉलिश, लिपस्टिक आदि सौंदर्यप्रसाधनांचाही समावेश झाला आहे.
३. युनानी, आयुर्वेदिक इत्यादि औषधे यांतही हलालची संकल्पना आली आहे.
४. हलाल गृहसंकुल : केरळ राज्यातील कोची शहरात भारतातील पहिले शरियतच्या नियमांच्या आधारे हलाल प्रमाणित गृहसंकुल बनत आहे. यात स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे जलतरण तलाव, वेगवेगळी प्रार्थनाघरे, काबाच्या दिशेपासून दूर असणारी शौचालये, नमाजाच्या वेळा दाखवणारी घड्याळे, प्रत्येक घरात नमाज ऐकू येण्याची व्यवस्था अशा विविध सुविधांचा अन् शरियतच्या नियमांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे.
५. हलाल रुग्णालय : तमिळनाडूतील चेन्नई शहरातील ‘ग्लोबल हेल्थ सिटी’ या रुग्णालयाला हलाल प्रमाणित घोषित करण्यात आले आहे. त्यांचा दावा आहे की, इस्लाममध्ये सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता आणि आहार आम्ही देतो.
६. हलाल ‘डेटिंग वेबसाईट’ : संकेतस्थळांवर युवक-युवतींना परिचय करून देणारी, त्यातून मैत्री, तसेच भेटी घडवणारी अनेक संकेतस्थळे आहेत. यातही इस्लामच्या शरियतवर आधारीत ‘हलाल डेटिंग वेबसाईट्स’ चालू करण्यात आल्या आहेत. यात ‘मिंगल’ हे एक मुख्य संकेतस्थळ आहे.
थोडक्यात काय, तर जगासह भारत इस्लामी हलालद्वारे ‘आर्थिक जिहाद’ची शिकार झाला आहे आणि आपल्याला काहीच माहिती नाही; कारण आपण झोपले आहोत.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.