भारतात हलालच्या पैशातून आतंकवादाला मोठे साहाय्य !

जिहादला आर्थिक रसद पुरवण्याचे कार्य हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून केले जात आहे. भारतात हलाल प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ ही गृहमंत्री शहा यांना धमकावणारी, उत्तरप्रदेशमधील हिंदु नेते कमलेश तिवारी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचे, तसेच ७/११चे मुंबई रेल्वे बाँबस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बॉंबस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बाँबस्फोट, २६/११ चे मुंबई आक्रमण, मुंबईतील झवेरी बाजारातील साखळी बाँबस्फोट, देहलीतील जामा मशीद स्फोट, अहमदाबाद शहरातील स्फोट आदींतील आरोपी अशा प्रकारचे एकूण ७०० जणांचे खटले लढवणारी संघटना आहे. त्यामुळे बहुसंख्य हलाल प्रमाणपत्र घेणारे आणि हलाल मांस खाणारे बहुसंख्य हिंदूच प्रचंड धनशक्तीद्वारे त्यांच्या एकप्रकारे स्वतःच्या विनाशाला कारण ठरत आहेत !

भविष्यात या देशविरोधी शक्तीमागे राजकीय शक्ती उभी राहून देशातील यंत्रणांना विकत घेण्याचे षड्यंत्र केले जाऊ शकते. सध्या ‘हलाल प्रमाणपत्र’ नावाची नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून त्यामुळे देशाच्या सुरक्षेला अंतर्गत धोका निर्माण होत आहे. त्याद्वारे भविष्यात भारतातील उद्योजक आणि व्यापारी यांच्यासाठीही धोकादायक ठरू शकते.

– श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.