Jaishankar Iran Visit : भारताजवळील समुद्रात नौकांवर होणारी आक्रमणे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची गोष्ट ! – डॉ. एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – भारताजवळील समुद्रात नौकांवर होणारी आक्रमणे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची गोष्ट आहे. याचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा आणि आर्थिक हितांवर होतो. भारत नेहमीच आतंकवादाच्या विरोधात राहिला आहे. कोणत्याही तणावाच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण केले पाहिजे, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी इराणच्या दौर्‍यावर असतांना केले आहे.

त्यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांची भेट घेतली. अफगाणिस्तान, गाझा आणि युक्रेनमधील युद्ध अशा अनेक सूत्रांवर भारत आणि इराण यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली.

हुती बंडखोरांच्या आक्रमणांमुळे लाल समुद्रातून होणारा व्यापार अडचणीत आला आहे. याविषयी, तसेच इराणमधील चाबहार बंदर यासंदर्भातही भारत आणि इराण यांच्यात चर्चा झाली.