केंद्रीय अन्‍वेषण विभागाच्‍या १२ ठिकाणी धाडी !

रेल्‍वे भरती प्रश्‍नपत्रिका फुटल्‍याचे प्रकरण

मुंबई – पश्‍चिम रेल्‍वेच्‍या रेल्‍वे भरती केंद्राद्वारे आयोजित केलेल्‍या सामान्‍य विभागीय स्‍पर्धा परीक्षेच्‍या प्रश्‍नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणात केंद्रीय अन्‍वेषण विभागाने मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्‍सर अशा १२ ठिकाणी धाडी घातल्‍या. यात अन्‍वेषण पथकांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्‍ट्रॉनिक पुरावे जप्‍त केले आहेत. या प्रकरणी काही जणांविरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. ‘व्‍हॉट्‌सअ‍ॅप’वर काही उमेदवारांकडे प्रश्‍नपत्रिका उपलब्‍ध होती’, असा आरोप आहे.