Why Bharat Matters : विकसित भारताच्या उदयाचे ‘रामायण’ महाकाव्याशी साधर्म्य ! –  परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन !

‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना उजवीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी पुस्तकात दिलेल्या ‘रामायण’ महाकाव्याच्या संदर्भांवर खुलासा केला आणि श्रीराम, लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्याविषयीच्या प्रसंगांतून भारताच्या उदयाचे वर्णन केले. ‘विकसित भारताच्या उदयाचे ‘रामायण’ महाकाव्याशी साधर्म्य आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

सौजन्य : एएनआय न्यूज 

१. एस्. जयशंकर म्हणाले की, भारताने जागतिक स्तरावर एका मोठा टप्पा गाठला आहे. या स्तरावर एकच कृती नाही, अशा अनेक कृती आहेत, जेथे आपला कस लागला. रामायण वाचले, तर आपल्या लक्षात येते की, अनेक प्रसंगांमध्ये श्रीरामाचा कस लागला; मात्र तो धनुष्यबाण घेऊन सज्ज झाला. भारतानेही अर्थशास्त्र, इतिहास, अणूऊर्जा, बांगलादेशची पुनर्रचना आदी क्षेत्रांत स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे.

२. हनुमानाला स्वत:चे सामर्थ्य विसरण्याचा शाप मिळाला होता. नंतर त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव झाली. भारताच्या संदर्भातही असेच घडत आहे. काही वर्षांपूर्वी जे भारताला अशक्य किंवा अवास्तव वाटत होते ते, आज सहजरित्या होतांना दिसते.