पणजी, २७ डिसेंबर (वार्ता.) : गेल्या २४ घंट्यांमध्ये गोव्यात कोरोनाबाधित १६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे समुद्रकिनारी भागात आणि सनबर्न परिसरात गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पथक, रॅपिड चाचणीविषयी साधने असणारे, तसेच अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञ नियुक्त करण्यात येतील, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकाकोरोनाबाधितांची संख्या वाढत असतांना ‘सनबर्न’सारखा लाखो लोक एकत्र येणारा कार्यक्रम आयोजित करणे दुर्दैवी ! |