सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार काढलेल्या सनातन-निर्मित दत्ताच्या चित्रांतील देवतातत्त्व (चैतन्य) उत्तरोत्तर वाढणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सौ. मधुरा कर्वे

‘उपासना करतांना उपासकाला भाव, आनंद आणि शांती यांची अनुभूती येण्यासाठी त्याचा उपास्य देवतेप्रती भाव जागृत होणे महत्त्वाचे असते. उपासनेतील उपास्य देवतेच्या चित्रात देवतेचे तत्त्व (तारक रूप असल्यास सात्त्विकता) जेवढे अधिक प्रमाणात असते, तेवढे ते चित्र उपासकाला त्या देवतेचे तत्त्व ग्रहण करण्यास अधिक उपयुक्त ठरते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-चित्रकारांनी काढलेली श्री गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, दत्त, शिव, श्री लक्ष्मी आणि श्री दुर्गा या देवतांची चित्रे सनातन संस्थेने प्रकाशित केली आहेत. या चित्रांमध्ये त्या त्या देवतांचे तत्त्व आले आहे. वर्ष २००० ते २०२२ या कालावधीत देवतांच्या चित्रांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार सांगितलेले पालट करण्यात आले. त्यामुळे या चित्रांतील त्या त्या देवतांचे चैतन्य उत्तरोत्तर वाढत गेले. यांपैकी सनातन-निर्मित दत्ताच्या चित्रांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी या चित्रांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. सनातन-निर्मित दत्ताच्या चित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

सनातन-निर्मित दत्ताच्या आठही चित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. वर्ष २०२२ मधील दत्ताच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सर्वाधिक आहे.

टीप – वर्ष २०१८, २०१९ आणि २०२२ मधील दत्ताच्या चित्रांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे मोजतांना ती २,३३७ मीटरपेक्षाही अधिक होती; पण ती पूर्ण मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. त्यामुळे त्या चित्रांतील सकारात्मक ऊर्जा अचूक मोजण्यासाठी ती लोलकाने मोजण्यात आली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. सनातन-निर्मित दत्ताचे चित्र साधक-कलाकारांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच ‘साधना’ म्हणून, तसेच स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार काढलेली असणे : स्पंदनशास्त्रानुसार एखाद्या देवतेचे चित्र किंवा मूर्ती तिच्या मूळ रूपाशी जेवढी अधिक मिळती-जुळती असेल, तेवढी त्या चित्रात किंवा मूर्तीमध्ये त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होतात. चित्रातील देवतेचा आकार, तिचे अवयव, तिच्या अंगावरील अलंकार, तिची शस्त्रे इत्यादी घटक देवतेच्या प्रत्यक्षातील त्या त्या घटकांशी किती प्रमाणात जुळतात, यावरून त्या चित्राची एकूण सत्यता ठरते. प्रत्येक देवतेचे िचत्र काढून झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्या चित्राची सात्त्विकता

तून जाणून ती टक्क्यांमध्ये सांगितली आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक-कलाकारांना काळानुसार केलेल्या मार्गदर्शनाचे फलित म्हणजे दत्ताच्या चित्रातील सात्त्विकतेचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले. वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेल्या चाचण्यांतूनही हे दिसून आले.

२ आ. वर्ष २०२२ मधील सनातन-निर्मित दत्ताच्या चित्रात सर्वाधिक (३१.४ टक्के) सात्त्विकता असणे : कलियुगात सर्वसामान्य मनुष्याने निर्माण केलेल्या देवतेच्या एखाद्या कलाकृतीत, म्हणजे चित्र किंवा मूर्ती यामध्ये अधिकाधिक ३० टक्के सात्त्विकता, म्हणजे सत्यता येऊ शकते. वर्ष २०२२ मधील दत्ताच्या चित्रामध्ये त्याहून जास्त (३१.४ टक्के) सात्त्विकता येणे, हा सनातनच्या साधक-कलाकारांच्या उच्चतम भावावस्थेचा परिणाम आहे.

२ इ. सनातन-निर्मित दत्ताच्या चित्रांत संतांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पालट केल्यामुळे चित्रांतील सात्त्विकतेत उत्तरोत्तर वाढ होत जाणे

१. वर्ष २००० मधील चित्राच्या तुलनेत वर्ष २००२ मधील चित्रामध्ये देवाचे मुख समोरच्या दिशेने असणे, हातात अन् गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असणे, अंगकांती अधिक निळसर असणे, गायीच्या चित्रात काही पालट करणे, चित्रात ४ श्वान दाखवणे, सुदर्शन चक्र देवतेच्या तर्जनी ऐवजी करंगळीवर दाखवणे इत्यादी सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे चित्राच्या सात्त्विकतेत ४ टक्के वाढ होऊन ती ६ टक्के झाली.

२. वर्ष २००३ मधील चित्रात देवतेच्या मागील पार्श्वभूमी पालटणे, देवतेच्या मागे औदुंबराचा वृक्ष दाखवणे, गायीचे चित्र चांगले करून तिला देवतेच्या मागे दाखवणे, देवतेचे चरण नीट दिसतील असे करणे, देवतेच्या गळ्यातील रुद्राक्षाच्या माळांची संख्या आणि लांबी वाढवणे, देवतेच्या तीनही मुखांवरील भावात पालट करणे, देवतेच्या हातांची स्थिती पालटणे, देवतेचे वस्त्र केशरीऐवजी पिवळ्या रंगाचे करणे, श्वानांची चित्रे पालटणे इत्यादी पालट करण्यात आले. त्यामुळे या चित्राची सात्त्विकता ७ टक्के झाली.

३. वर्ष २०१० मधील चित्रात देवतेच्या मागे असलेल्या गायीचे मुख देवतेच्या उजव्या बाजूला दाखवणे, देवतेच्या सर्व हातांचा रंग निळसर करणे, देवतेचा मागील वृक्ष अन् पार्श्वभूमी चांगली करणे, श्वानांची चांगली चित्रे घेणे, दत्ताच्या शिवाच्या डोक्यावरील नाग नीट दिसेल असे करणे, वृक्षाचे खोड नीट दिसेल असे करणे, देवतेच्या मुखांमागे असलेली निळसर प्रभावळ काढून टाकणे आणि देवतेच्या चरणावरील पांढरा ‘ग्लो’ (प्रकाश) काढून टाकणे इत्यादी पालट करण्यात आले. त्यामुळे चित्रातील सात्त्विकता दुपटीने वाढून ती १४ टक्के झाली.

४. वर्ष २०१६ मधील चित्रात देवतेची पार्श्वभूमी फिकट करणे, चित्रांतील सर्व घटकांची ‘आऊटलाईन’ (बाहेरील कड) ठळक करणे, वृक्षाचे खोड चांगले करणे, देवतेच्या मुखांमागे फिकट पांढरा ‘ग्लो’ दाखवणे, देवतेपासून श्वान थोडे लांब अंतरावर दाखवणे, देवतेच्या चरणाभोवती फिकट ‘ग्लो’ दाखवणे, दत्ताच्या शिवाच्या डोक्यावरील गंगेची धार उठावदार करणे इत्यादी पालट करण्यात आले. या चित्रातील सात्त्विकता वाढून ती १९ टक्के झाली.

५. वर्ष २०१८ मधील चित्रात देवतेची अंगकांती निळसर ऐवजी पिवळसर करणे, गायीचा रंग थोडा अजून श्वेत करणे, श्वानांच्या स्थितीत पालट करणे, वृक्षाच्या चित्रात पालट करणे इत्यादी पालट करण्यात आले. त्यामुळे या चित्रातील सात्त्विकता वाढून ती २५ टक्के झाली.

६. वर्ष २०१९ मधील चित्रात वृक्षाच्या चित्रात पालट करणे, देवतेची अंगकांती निळसर करणे, चारही श्वान खाली बसलेल्या स्थितीत घेणे, चित्राची पार्श्वभूमी फिकट अन् चांगली करणे इत्यादी पालट करण्यात आले. या चित्रातील सात्त्विकता वाढून ती ३१.१ टक्के झाली.

७. वर्ष २०२२ मधील चित्रात देवतेची निळसर अंगकांती थोडीशी गडद करणे, पार्श्वभूमी फिकट करणे, देवतेच्या हातातील त्रिशुळ उठावदार करणे इत्यादी पालट करण्यात आले. या चित्रातील सात्त्विकता वाढून ती ३१.४ टक्के झाली.

थोडक्यात, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्पंदनशास्त्रानुसार आणि काळानुसार साधक-कलाकारांना केलेल्या मार्गदर्शनामुळे देवतेच्या चित्रामध्ये उत्तरोत्तर अधिक सात्त्विकता निर्माण झाली. सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती देतात. ही सेवा करतांना साधक-कलाकारांमध्ये ईश्वराप्रती भाव निर्माण झाला. यातून ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच कलेतील साधनेचे महत्त्व लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.१२.२०२३)

ई-मेल : [email protected]

‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच कलेतील साधनेचे महत्त्व लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.१२.२०२३)

‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच कलेतील साधनेचे महत्त्व लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.१२.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.