नवी देहली – रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, अशी माहिती केंद्रीय संस्कृतीमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. मंत्री रेड्डी यांनी यात पुढे म्हटले आहे की, रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाही. स्मारक आणि स्थळ यांची घोषणा ‘प्राचीन स्मारक आणि पुरातात्विक स्थळ अन् अवशेष अधिनियम, १९५८ चे कलम ४’ अंतर्गत केली जाते.