Diwali Deepawali diwali 2023 deepawali 2023 Lakshmipujan
अ. बलीप्रतिपदेच्या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करतात.
आ. ‘बलीराज्यात शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे’, असे धर्मशास्त्र सांगते. अभक्ष्यभक्षण, अपेयपान आणि अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवतात (आतषबाजी करतात); पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने अनुमती दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात.
इ. या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवतात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची, तसेच श्रीकृष्ण, इंद्र आणि गाय यांची पूजा करण्याची प्रथा आहे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)