जागतिक स्तरावर तिसर्या महायुद्धाचे वारे कधीच वाहू लागले आहेत. युक्रेन आणि रशिया युद्धभूमी थंड होत नाही, तोपर्यंत हमासने इस्रायलसारख्या अजिंक्य देशावर आक्रमण करायचे धैर्य केले. भारतासाठी संरक्षणार्थ पुढील अधिक कठोर धोरणे अवलंबून आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारी ही घटना आहे. मालदीवमध्ये स्वधार्जिणे राष्ट्रप्रमुख आणण्यात चीन यशस्वी झाला आहे. पाक देशोधडीला लागला, तरी अयशस्वी क्षेपणास्त्र चाचण्या करणे आणि भारतद्वेषाचे फुत्कार सोडणे काही थांबवत नाही. ‘भारत ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो’, हे लक्षात आल्याने आतंकवादी आता मोठी आक्रमणे करत नाहीत; परंतु अमली पदार्थ, बनावट नोटा, भारतभरात विविध प्रकारच्या जिहादांना प्रोत्साहन देऊन अंतर्गत बंडाळी फोफावण्यासाठी पाकची कुकृत्ये जोमाने चालूच आहेत. काश्मीरमधील ‘दगडफेक’ बंद करण्यात भारताचे शासन यशस्वी झाले, तरी काश्मीरमधील धग अजूनही पूर्ण विझलेली नाही. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि कृषी कायदे यांना विरोध करण्याच्या नावाखाली शीख समुदाय अन् साम्य(नक्षल)वादी यांना हाताशी धरून आतंकवाद्यांनी केलेल्या दंगली आणि निर्माण केलेली अस्थिरता आपण विसरू शकत नाही. देशद्रोह्यांच्या घरावर ‘बुलडोझर’ चालवण्याने त्याला प्रत्युत्तर मिळाले असले, तरी आता तेही पुरेसे नाही. आसामप्रमाणे देशभरातील शेकडो अनधिकृत मशिदी पूर्णतः भुईसपाट होऊन राष्ट्रद्रोह्यांना अधिक कठोर संदेश गेला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदी यांनी सर्व राष्ट्रांशी निर्माण केलेले सलोख्याचे संबंध आणि सध्या राबवण्यात येत असलेले कठोर परराष्ट्रीय धोरण भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने लाभदायक ठरल्याचे खलिस्तानवादी कॅनडाच्या नरमाईच्या उदाहरणातून लक्षात आले. भारताने गेल्या काही मासांत अमली पदार्थांच्या विरोधात कडक धोरण अवलंबले, तरी त्याला पुष्कळ विलंब झाल्याने भारताला पोखरणार्या या कीडीची पाळेमुळे खोलवर गेली आहेत. थोडक्यात काय, तर ‘राष्ट्राला ‘विकासा’च्या शिखराकडे नेण्याचे स्वप्न सर्व जण पहात असतांना त्याला खर्या अर्थाने सर्वदृष्ट्या ‘विजयी’ करण्यासाठी अद्यापही बहुसंख्य हिंदूंना कठोर परिश्रम आणि संघर्ष करावयाचा आहे’, हे हिंदूंनी विजयादशमीच्या निमित्ताने मनावर बिंबवायला हवे.
वैचारिक युद्धही जिंका !
ख्रिस्ती मिशनरी आणि शहरी नक्षलवादी अन् साम्यवादी यांना विदेशातून येणारा पैसा रोखण्याची प्रक्रिया शासनाकडून चालू झाल्याने हिंदुविरोधी चळवळींना मर्यादा आल्या. त्यामुळे देश-विदेशात पसरलेल्या हिंदुविरोधकांनी २ वर्षांपूर्वी ‘डिसमेंटल ग्लोबल हिंदुत्वा’ची ऑनलाईन मोहीम चालू केली. त्याचा जागतिक स्तरावर तज्ञ आणि अभ्यासू हिंदुत्वनिष्ठ यांनी तेवढ्याच जोराने वैचारिक प्रतिवाद केला, तरीही ‘आजही भारतातील ‘स्टॅलिन’ सनातन धर्माच्या मुळावर उठलेले आहेत’, हे वास्तव आहे. ‘सध्या सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात हिंदूंचा गौरवशाली इतिहास आणि धर्मसंस्कृती यांचे महत्त्व यांचा प्रसार हिंदु युवकांकडून होत आहे’, ही हिंदूंच्या विजयाची छोटीशी नांदी आहे. या वैचारिक क्रांतीतूनच हिंदूंमध्ये अत्यावश्यक राष्ट्र आणि धर्म अस्मिता निर्माण होणार आहे, जी हिंदुत्वाच्या विजयाची पताका अटकेपार फडकावण्यास साहाय्यभूत ठरून खरे सीमोल्लंघन होणार आहे. भारताच्या यशस्वी चंद्रयान मोहिमेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी बनवलेल्या ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पुस्तिकेत वेदांतील वैज्ञानिक प्रगतीचा उल्लेख करण्यात आला आहे. अधिकृतरित्या हे झाल्यामुळे आता साम्यवाद्यांमधील अस्वस्थता जोर धरणार आहे. हिंदूंच्या वैचारिक संघर्षाला शासनाकडून दुजोरा मिळणे, ही समाधानाची गोष्ट झाली आहे. गेली ६० वर्षे काँग्रेस सरकारने साम्यवाद्यांच्या आहारी जाऊन नियोजनबद्धरित्या शैक्षणिक क्षेत्रात घुसून वैचारिक स्तरावर हिंदु धर्मावर आक्रमण केले. साम्यवाद्यांनी शेकडो हिंदुत्वनिष्ठ नेतृत्वांच्या हत्या करून शारीरिक स्तरावर भयावह आक्रमण केले. हे मोडून काढण्याची प्रक्रिया हिंदुत्वनिष्ठांकडून गेल्या १० वर्षांपूर्वी चालू झाली अन् आता ती गती घेत आहे. दुसरीकडे जिहाद्यांची आक्रमणे चालूच आहेत.
हिंदूंचे प्रत्युत्तर हवे !
विज्ञान आणि अध्यात्म यांची सर्वाेत्तम सांगड असणार्या सनातन ऋषिसंस्कृतीचे तपोसामर्थ्य हेच आज लक्षावधी वर्षे विजयोत्सव साजरा करत असलेल्या सनातन भारतीय संस्कृतीचे बळ आहे. ब्राह्म आणि क्षात्र तेज संपन्न ऋषींनी अनेक असुरांसह इंद्रादी देवांनाही पराभूत केले होते. त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य हीच त्यांची सर्वप्रकारची खरी ‘शक्ती’ होती. गैरहिंदूंना गरबास्थळी प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्याचे धाडस दाखवणारे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हे दुसरे वर्ष आहे. त्याविरोधात म्हणून मुद्दामहून अंनिससारख्या संघटनेने ‘समत्वाचा गरबा’चे आयोजन करणे, म्हणजे ते धर्म आणि हिंदु द्वेषापोटी अंधपणाने किती खालच्या स्तराला जाऊन स्वसमाजाची हानी करून घेत आहेत’, याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे शक्तीची उपासना ही केवळ गरबा खेळण्यापुरती मर्यादित न ठेवता आता ‘संङ्घे शक्ति: कलौ युगे ।’ हाच उद्घोष कंठस्थ करण्याची ही वेळ आहे.
सैनिक राष्ट्राच्या प्रचंड मोठ्या सीमेवर चोहोबाजूंनी प्राणांची बाजी लावून उभे आहेत. स्वदेशी शस्त्रास्त्रांनी भारत सुसज्ज होत असल्याने त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. असे असतांना देशांतर्गत धर्मांध उघडपणे ठिकठिकाणी देत असलेल्या हिंदुविरोधी चिथावण्या आणि मशिदींतील फतवे त्यांनुसार होणार्या दंगली अन् विविध जिहाद यांना तोंड देण्यासाठी प्रशासनावर अवलंबून न रहाता हिंदूंनी स्वरक्षणार्थ सर्वदृष्ट्या सज्ज होणे अतिशय आवश्यक आहे. २ मासांपूर्वी औरंगजेबाचे उदात्तीकरण झाल्यावर कोल्हापूरमध्ये प्रथमच सहस्रो हिंदू उत्स्फूर्तपणे एकत्र आले. तसेच आता वारंवार होणे, ही काळाची आवश्यकता आहे. ‘साधना करणार्या आणि आत्मबळ वाढलेल्या हिंदूंचे प्रभावी संघटन हेच अंतिमतः राष्ट्राला तारू शकणार आहे’, हे हिंदूंचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून त्यांनी लक्षात घेतले पाहिजे आणि भारताला अंजिक्य करण्यासाठी संघटनाचे शस्त्र उचलून ते शास्त्रशुद्धरित्या चालवले पाहिजे !