श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे  स्‍मरण करताच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्‍मरण केल्‍यावर जसे जाणवते, अगदी तसेच जाणवत असल्‍याचे अनुभवता येणे !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘मागील काही वर्षांपासून मला जेव्‍हाही श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे स्‍मरण होते, तेव्‍हा प.पू. गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांचे स्‍मरण केल्‍यावर जशी माझी भावजागृती होणे, उत्‍साह वाढणे आणि आनंद जाणवणे, असे अनुभवता येते, अगदी तसेच मला अनुभवता येते. आरंभी मला असे जाणवत असल्‍याचे माझ्‍या लक्षात येत नव्‍हते. नंतर काही काळाने माझ्‍या हे लक्षात आले. त्‍यामुळे ‘ते दोघेही एकच आहेत’, असे मला जाणवते.’

– श्री. सुदीश पुथलत (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के, वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०२३)