पौर्णमास इष्‍टीच्‍या वेळी अग्‍निनारायणाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना श्रीपरशुरामाचा तेजांशाने युक्‍त असणारा कुंभ देणे

‘पौर्णमास इष्‍टीच्‍या वेळी यज्ञज्‍वालेतून साक्षात् प्रगट झालेल्‍या अग्‍निनारायणाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना श्रीपरशुरामाचा तेजांशाने युक्‍त असणारा दैवी शक्‍तीचा कुंभ देणे आणि त्‍यामुळे पृथ्‍वीवर प्रथम सूक्ष्मातून आणि नंतर स्‍थुलातून हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करता येणार असणे :

कु. मधुरा भोसले

१७ जानेवारी २०२३ या दिवशी गोव्‍यात पौर्णमास इष्‍टी झाली. या शुभप्रसंगी सनातन संस्‍थेच्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उपस्‍थित होत्‍या. तेव्‍हा त्‍यांनी यज्ञाच्‍या पवित्र अग्‍नीचे दर्शन घेतले. तेव्‍हा यज्ञज्‍वालेतून साक्षात् अग्‍निनारायण प्रगट झाला. त्‍याने श्रीपरशुरामाचा तेजांश, म्‍हणजे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी संपन्‍न असलेल्‍या दैवी शक्‍तीचा कुंभ श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना दिला. त्‍यामुळे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या दैवी शक्‍तीमध्‍ये वृद्धी होऊन संपूर्ण पृथ्‍वीवर प्रथम सूक्ष्मातून आणि नंतर स्‍थुलातून हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करता येणार आहे.’

–  कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२३) 

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.