समलैंगिक विवाह करणार्‍यांना आशीर्वाद द्या ! – पोप फ्रान्सिस

  • पोप फ्रान्सिस यांनी पाद्य्रांना केली सूचना !

  • चर्चच्या पालटलेल्या भूमिकेवरून काही पाद्य्रांनी उपस्थित केले प्रश्‍न !

पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – आतापर्यंत समलैंगिक विवाहांना विरोध करणार्‍या व्हॅटिकन सिटीने आता समलैंगिक विवाहाला समर्थन देण्याचा विचार मांडला आहे. या संदर्भात ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रिन्सिस यांनी सूचना करतांना म्हटले होते, कॅथॉलिक पाद्री समलैंगिक विवाहांना आशीर्वाद देऊ शकतात; मात्र यात काही अटीही असतील. प्रत्येक विवाहानुसार असे करता येईल.’ या सूचनेवर काही पाद्य्रांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, अशा आशीर्वादाचा अर्थ चर्चचे शिक्षण आणि सिद्धांत यांच्यावर आक्रमण असेल.

१. वाल्टर ब्रँडमूलर, रेमंड लियो बुरके, जुआन सँडोवल इंगेज, रॉबर्ज सराब आणि जोसेफ जे किउन या पाद्य्रांनी यावर प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यांनी असेही म्हटले आहे की, यात पोप फ्रान्सिस यांचा उद्देश काय आहे ?

२. या संदर्भात त्यांनी १० जुलै या दिवशी पोप यांना पत्र पाठवले होते; मात्र त्यावरील उत्तरांवर संतुष्ट न झाल्याने त्यांनी २१ ऑगस्टला पुन्हा पत्र लिहिले. या पत्रावर उत्तर देतांना पोप यांनी लिहिले आहे की, जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देण्यास सांगितले जात आहे, याचा अर्थ ‘देवाकडून साहाय्य मागण्यासाठी प्रार्थना करणे’ असे आहे. पाद्य्रांनी विवेक दाखवला पाहिजे.