यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
यवतमाळ, १२ ऑगस्ट (वार्ता.) – जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज, मुखपट्टी विक्री करतात, ज्या व्यक्ती, दुकाने, आस्थापने, संघटना अथवा समूह आदी ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन १० ऑगस्ट या दिवशी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथे देण्यात आले. निवासी अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी हे निवेदन स्वीकारून ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करू’, असे आश्वासन दिले.
वणी, आर्णी, दिग्रस येथेही स्थानिक तहसीलदार आणि पोलीस ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.