गुजरातमध्ये राष्ट्रध्वजाला सलाम न करण्याचा आणि राष्ट्रगीत न गाण्याचा मौलानाने काढला फतवा !

(‘फतवा’ म्हणजे इस्लामी कायद्यानुसार एखाद्या सूत्रावर इस्लाममधील मान्यताप्राप्त व्यक्ती किंवा संस्था यांनी दिलेला निर्णय.)

पोरबंदर (गुजरात) – मुसलमानांनी ध्वज फडकावला पाहिजे; मात्र राष्ट्रध्वजाला सलाम करू नका, राष्ट्रगीत गाऊ नका, असा फतवा एका मौलाना हाफिज वसिफ रझा यांनी काढल्याचे वृत्त नुकतेच प्रसारित झाले होते. त्याचा व्हिडिओ साामजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर मुसलमान समाजातील काही तरुणांनी रझा यांना विरोध केला आणि असा फतवा काढणे इस्लामच्या विरोधात असल्याचे म्हटले ‘राष्ट्राशी एकनिष्ठ असणे आवश्यक असल्याचे इस्लाममध्ये म्हटले आहे’, असे या तरुणांचे म्हणणे होते.

१. मौलानाच्या व्हिडिओनंतर ‘नगीना मस्जिद, पोरबंदर’ आणि ‘दारूल उलूम गौशे आझम ट्रस्ट’ यांनी मौलानाच्या व्हिडिओमुळे अनेकांनी मारहाण करण्याची आणि ठार मारण्याची धमकी दिली, अशी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

२. ‘मौलानाचा फतवा चुकीचा आहे. त्यांचा आदेश अयोग्य आहे’, असे काही मुसलमान तरुणांनी सांगितले. मौलानाला विरोध केला; म्हणून मुसलमान समुदायातील काही लोक आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप या तरुणांनी केला होता. यासोबतच त्यांना समाजातून हद्दपार करण्याचेही प्रयत्न चालू असल्याचा आरोप त्यांनी केला.

३. ‘नगीना मस्जिद, पोरबंदर’ आणि ‘दारूल उलूम गौशे आझम ट्रस्ट’ यांच्या तक्रारीनंतर शकली कादरी, सोहेल इब्राहिम आणि इम्तियाज हारून यांनी सामाजिक माध्यमांवर व्यथा मांडतांना ‘फिनाईल’ प्राशन केले.

४. पोरबंदरचे पोलीस अधीक्षक भगीरथ सिंह यांनी या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू असल्याचे सांगितले.

संपादकीय भूमिका

सातत्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व जोपासण्यासाठी राष्ट्रघातकी कृत्ये करणारे बहुतांश मुसलमान ! मुसलमानांच्या राष्ट्रनिष्ठेवर कुणी शंका उपस्थित केल्यास निधर्मीवादी चवताळून उठतात. त्यांना या फतव्याविषयी काय म्हणायचे आहे ?