मध्यप्रदेशात मंदिरांच्या भूमीचा लिलाव करण्याचा अधिकार आता मंदिरांच्या पुजार्‍यांना !

  • लिलावातून आलेला पैसा मंदिराच्या बँक खात्यात जमा होणार !

  • खाजगी मंदिरांच्या पुजार्‍यांना देणार मानधन !

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशच्या भाजप सरकारच्या मंत्रीमंडळाने राज्यातील मंदिरांची भूमी जिल्हाधिकारी नाही, तर मंदिराचे पुजारी लिलावात काढू शकतात, असा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी मंदिरांच्या पुजार्‍यांना मानधन देण्याचाही निर्णय घेतला आहे. एप्रिल मासात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या संदर्भात घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यावर निर्णय घेण्यात आला आहे.

सौजन्य टीव्ही9 भारतवर्ष 

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मंदिराची १० एकर पर्यंत असलेली कृषीक्षेत्र असलेली भूमी पुजार्‍यांच्या उत्पन्नाचे साधन असणार आहे. त्याव्यतिरिक्त भूमीचा लिलाव करण्यात येणार आहे. यातून जो पैसा मिळेल, तो मंदिराच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मंदिरांची भूमी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यातील ज्या मंदिरांकडे कृषीक्षेत्र असणारी भूमी नाही त्या मंदिरांच्या पुजार्‍यांना सरकारकडून ५ सहस्र रुपये मासिक मानधन देण्यात येत आहे. तसेच ज्यांच्याकडे ५ एकर कृषी क्षेत्र असणारी भूमी आहे त्या मंदिरांच्या पुजार्‍यांना अडीज सहस्र रुपये मानधन देण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका 

मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !